शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला भोवली अंतर्गत बंडाळी

By admin | Updated: September 16, 2015 00:39 IST

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पालकमंत्री पंकजा मुंडे प्रणित पॅनलमधील उमेदवारांपेक्षा नेतृत्वाची संख्या वाढल्याने मोठी गटबाजी निर्माण झाली.

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाईयेथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पालकमंत्री पंकजा मुंडे प्रणित पॅनलमधील उमेदवारांपेक्षा नेतृत्वाची संख्या वाढल्याने मोठी गटबाजी निर्माण झाली. अंतर्गत बंडाळी, प्रचार यंत्रणेत नसलेला सुसंवाद, क्रॉस व्होटींग यामुळे भाजपला पराभव पहावा लागला. दुसरीकडे, काँगे्रस-राकाँची व्यूहरचना व नेत्यातील एकीचे बळ विजयासाठी कामी आले.पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याविरूद्ध विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व काँग्रेसचे प्रा. टी. पी. मुंडे यांच्या पॅनलमध्ये तिरंगी लढत झाली. पालकमंत्री व विरोधी पक्षनेते यांनी जोर लावल्यामुळे निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. पंकजा मुंडे यांनी पॅनल भक्कम करण्यासाठी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, रमेशराव आडसकर, अ‍ॅड. आनंदराव चव्हाण, अशोकराव देशमुख, दत्तात्रय पाटील, राजाभाऊ औताडे अशा तगड्या नेत्यांकडे धुरा सोपविली होती तर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी काँग्रेसच्या नेत्यांशी हातमिळवणी करीत मजबूत मोट बांधली. नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, संजय दौंड, राजेसाहेब देशमुख, हनुमंत मोरे यांनी धनंजय मुंडे यांच्याकडून किल्ला लढवला.या निवडणुकीच्या निमित्ताने शहरात मोदी-मुंदडा पुन्हा आमने सामने आले. अंबाजोगाई शहरांवर मोदींचे असणारे वर्चस्व याचा मोठा फायदा पंकजा मुंडे यांच्या पॅनलला होईल अशी अपेक्षा होती. मात्र, ती अपेक्षाही फोल ठरली. नंदकिशोर मुंदडा यांचे समर्थक नूर पटेल व राजकिशोर मोदी यांचे समर्थक प्रकाश सोळंकी या दोघांनाही पराभवाचा सामना करावा लागला. वर्षभरापूर्वी भाजपात प्रवेश केलेले सुनील लोमटे यांच्या विजयामुळे भाजपला नवे नेतृत्व मिळाले आहे तर अक्षय मुंदडा यांचे नेतृत्वही या निवडणुकीच्या निमित्ताने सिद्ध झाले. कार्यकर्त्यांचा अतिआत्मविश्वास व गटबाजी याचा फटका भाजपला सहन करावा लागला.परळी व केज मतदार संघ अशी विभागणी अंबाजोगाई तालुक्याची असल्याने आगामी काळातली अनेक गणिते या निवडणुकीवर अवलंबून होती. झालेल्या चुकांची दुरुस्ती जर वेळीच नाही केली तर पंकजा मुंडे यांना आगामी काळात कार्यकर्त्यांच्या गटबाजीचा मोठा फटका सहन करावा लागेल अशी सध्याची राजकीय स्थिती आहे.