भाजपा आंदोलकांनी महावितरणच्या कार्यालयाला ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 12:27 IST2021-02-05T12:20:59+5:302021-02-05T12:27:18+5:30

वाढीव वीजबिलात कुठलीही सवलत दिली जात नाही यामुळे नागरिक त्रस्त आहेत.

BJP protesters avoid knocking on MSEDCL office | भाजपा आंदोलकांनी महावितरणच्या कार्यालयाला ठोकले टाळे

भाजपा आंदोलकांनी महावितरणच्या कार्यालयाला ठोकले टाळे

ठळक मुद्देमहावितरणने जबरी वसुली थांबवून त्यांना दिलासा द्यावा. वीज बिलात सूट दिली नाही तर आंदोलन तीव्र करू

औरंगाबाद : महावितरणने जबरी वसुली थांबवावी, कोरोना काळातील वीजबिल माफ करावे अथवा हप्ते पाडून द्यावे अशा मागण्या करत भाजपाने शुक्रवारी सकाळी ११ वाजता महावितरणच्या विरोधात गारखेडा येथील सहाय्यक अभियंता कार्यालयासमोर हल्लाबोल आंदोलन सुरु केले आहे. वाढीव वीजबिलात सूट देण्याची मागणी लावून धरत आक्रमक आंदोलकांनी  सहाय्यक अभियंता कार्यालयास टाळे ठोकले.

कोरोना काळातील १०० युनिटची सूट मुख्यमंत्र्यांनी मान्य केली होती ती दिली जात नाही. वाढीव वीजबिलात कुठलीही सवलत दिली जात नाही यामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यांना दिलास द्यावा अशा मागण्या करून भाजपने शुक्रवारी सकाळी महावितरणच्या गारखेडा येथील सहाय्यक अभियंता कार्यालयावर हल्लबोल आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. ऊर्जामंत्री नितीन राऊत हाय हाय, आघाडी सरकार मुर्दाबाद, लाईट बिल माफ झालेच पाहिजे अशा घोषणा देत आंदोलकांनी महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकले. 

कोरोनामुळे नागरिक आर्थिक अडचणीत आहेत. महावितरणने जबरी वसुली थांबवून त्यांना दिलासा द्यावा. आज केवळ टाळे लावून चेतावणी दिली. लोकांना वीज बिलात सूट दिली नाही तर आंदोलन तीव्र करू असा इशारा आ.अतुल सावे यांनी यावेळी दिला.

Web Title: BJP protesters avoid knocking on MSEDCL office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.