मराठा आरक्षणासाठी भाजप जिल्हाध्यक्षाचा राजीनामा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 17:08 IST2018-07-26T17:05:31+5:302018-07-26T17:08:22+5:30

मराठा आरक्षणाला पाठिंबा देत भाजपाचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष (ग्रामीण ) एकनाथ जाधव यांनी आज राजीनामा दिला.

BJP Jilha President resigns for Maratha reservation | मराठा आरक्षणासाठी भाजप जिल्हाध्यक्षाचा राजीनामा 

मराठा आरक्षणासाठी भाजप जिल्हाध्यक्षाचा राजीनामा 

वैजापुर : मराठा आरक्षणाला पाठिंबा देत भाजपाचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष (ग्रामीण ) एकनाथ जाधव यांनी आज राजीनामा दिला.

मागील आठ दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक आंदोलन सुरु झाली आहेत.तसेच सोमवारी (दि.२३) कायगाव टोका येथील आंदोलनात काकासाहेब शिंदे या युवकाने जीव दिला. यानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीस पाठिंबा देत मराठवाड्यात राजीनामा सत्र सुरु झाले आहे. यात कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव वैजापूरचे आमदार भाऊसाहेब पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा दिला. 

राजीनामा सत्रात आता औरंगाबाद भाजपचे जिल्हा अध्यक्ष एकनाथ जाधव यांचा समावेश झाला आहे. आज त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे आपला राजीनामा दिला. यात त्यांनी आपण काकासाहेब शिंदे यांच्या बलिदानाने व्यथित झालो असून मराठा आरक्षणाच्या मागणीस पाठींबा देत जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. 

Web Title: BJP Jilha President resigns for Maratha reservation