शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

उद्धवसेनेचे उमेदवार सुरेश बनकर यांच्यामागे आले भाजप पदाधिकारी 'चुपके चुपके'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 18:56 IST

भाजपचे अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष इद्रिस मुलतानी यांचा सूचक इशारा

- श्यामकुमार पुरेसिल्लोड : भाजपमधून उद्धवसेनेत गेलेले सुरेश बनकर यांनी सोमवारी दुपारी २:३० वाजता मोजक्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन रॅली न काढता सिल्लोड येथील निवडणूक निर्वाचन अधिकारी लतीफ पठाण यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.

उमेदवारी दाखल करताना त्यांच्यासोबत उद्धवसेनेचे रघुनाथ घरमोडे, रघुनाथ चव्हाण, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्कर घायवाट, शेख फेरोज, राष्ट्रवादीचे राहुल ताठे, भाजपचे अनेक पदाधिकारी खुलेआम सोबत आले होते; मात्र यावेळी गोची झाली ती भाजप कार्यकर्त्यांची. नेहमी सोबत असणाऱ्या भाजप नेत्यांना बनकर उद्धवसेनेत गेल्याने खुलेआम काम करणे कठीण झाले आहे. यामुळे ते सुरेश बनकर यांच्यामागे गुपचूप उभे राहताना दिसत आहेत. बनकर हे उमेदवारी दाखल करण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या गेटमधून आत आले, तेव्हा मीडियाचे प्रतिनिधी समोर उभे होते. यामुळे भाजपचे पदाधिकारी दोन पावले मागे हटले व त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, सेनेच्या नेत्यांचा पुढे केले आणि त्यांच्या पाठीमागे ते अर्ज दाखल करण्यासाठी गेले.

सत्तार यांनी लोकसभेत जसे काम केले तसेच काम करणार : मुलतानीयाबाबत भाजपचे अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष इद्रिस मुलतानी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ज्याप्रमाणे अब्दुल सत्तार यांनी लोकसभेत युतीचे काम केले, त्याप्रमाणेच आम्ही इमानेइतबारे सिल्लोड येथील स्थानिक भाजप पदाधिकारी सत्तार यांचे काम करीत आहोत.

पोलिसांनी इशारा देताच ढोल केले बंदसोमवारी मनोज जरांगे-पाटील समर्थक एका उमेदवाराने दुपारी २ वाजता ढोलताशे वाजवत सिल्लोड शहरातून मिरवणूक काढून उमेदवारी दाखल करण्याचा प्रयत्न केला; पण त्याला पोलिसांनी निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच रोखले व ढोल बंद करा, अन्यथा गुन्हा दाखल होईल, असा इशारा देताच त्यांनी ढोल बंद करून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील मिरकर त्यांच्यासोबत होते. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकsillod-acसिल्लोडAbdul Sattarअब्दुल सत्तार