भाजप व शिवसेनेकडून रिपाईवर अन्याय : रामदास आठवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 18:58 IST2019-02-21T18:57:55+5:302019-02-21T18:58:07+5:30
25 फेब्रुवारी रोजी प्रमुख कार्यकत्याबरोबर चर्चा करून पुढील धोरण ठरवणार

भाजप व शिवसेनेकडून रिपाईवर अन्याय : रामदास आठवले
औरंगाबाद : भाजप आणि शिवसेनेने नुकतीच युतीची घोषणा केली. मात्र, यावेळी आपल्याला विश्वासात घेतले गेले नाही आणि एकही जागा सोडली नाही. यामुळे भाजप व शिवसेनेने रिपाईवर अन्याय केल्याचा आरोप केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केला.
आठवले पुढे म्हणाले, युतीच्या वाटाघाटीत दोघांच्याच जागा वाटपावर तोडगा निघाला आहे. आम्ही कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढणार नाहीत. तसेच बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातही निवडणूक लढणार नाही असेही केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी जाहीर केले. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने 25 फेब्रुवारी रोजी प्रमुख कार्यकत्याबरोबर चर्चा करून पुढील धोरण ठरवणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
ठाकरेंनी मनाचा मोठ्पणा दाखवावा
युतीची घोषणा करताना भाजप आणि शिवसेनेने दोघातील जागा वाटप जाहीर केले. मात्र यात रिपाईला विश्वासात घेतले नाहीच शिवाय एकही जागा सोडली नाही. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मनाचा मोठेपणा करून आमच्यासाठी एक जागा सोडावी अशी मागणीसुद्धा त्यांनी यावेळी केली