भाजपाला पुन्हा हादरा
By Admin | Updated: October 3, 2014 00:33 IST2014-10-03T00:13:52+5:302014-10-03T00:33:55+5:30
बीड : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची संधी थोडक्यात हुकल्याने भाजपाला नुकताच धक्का बसला होता़ या धक्क्यातून भाजपाचे सदस्य पुरते सावरलेही नव्हते

भाजपाला पुन्हा हादरा
बीड : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची संधी थोडक्यात हुकल्याने भाजपाला नुकताच धक्का बसला होता़ या धक्क्यातून भाजपाचे सदस्य पुरते सावरलेही नव्हते तोच गुरुवारी सभापती निवडीचा बार उडाला़ दोन सदस्य गैरहजर राहिल्यामुळे अल्पमतात आलेल्या भाजपाने ऐनवेळी माघार घेतली़ त्यामुळे सभापतीपदाच्या निवडी बिनविरोध झाल्या अन् भाजपाला दुसरा जोराचा हादरा बसला़ शिक्षण व आरोग्य विभागाचे विद्यमान सभापती संदीप क्षीरसागर यांना पुन्हा संधी देण्यात आली तर कमल मुंडे, बजरंग सोनवणे, महेंद्र गर्जे यांनाही सभापतीपदाचा मान मिळाला़
दुपारी साडेबारा वाजता सभापतीपदाच्या निवडीची प्रक्रिया सभागृहात पार पडली़ दुपारी पाऊणेदोन वाजता गटागटाने सदस्य जि़प़ मध्ये दाखल झाले़
समाजकल्याण, महिला व बालकल्याण या दोन समित्यांच्या निवडींसाठी थेट निवड प्रकिया झाली तर कृषी व पशुसंवर्धन, शिक्षण व आरोग्य या समित्यांसाठी एकत्रित निवडी झाल्या़
भाजपाकडून समाजकल्याण समितीसाठी केज तालुक्यातील चिंचोलीमाळी गटाच्या सदस्या भाग्यश्री भारत गालफाडे तर राष्ट्रवादीकडून अंमळनेर गटाचे महेंद्र गर्जे यांचे नामनिर्र्देशनपत्र आले़ महिला व बालकल्याण समितीकरिता भाजपाकडून आनंदगाव गटाच्या सदस्या सुनंदा गंगाभिषण थावरे यांनी तर राष्ट्रवादीकडून वडवणी गटाच्या राष्ट्रवादीच्या सदस्या कमल मोहन मुंडे यांनी अर्ज दाखल केला़ उर्वरित दोन विषय समित्यांसाठी शिवसेनेचे पाली गटाचे सदस्य किशोर माणिक जगताप तर भाजपाचे सिरसाळा गटाचे सदस्य वृक्षराज व्यंकटराव निर्मळ यांचे अर्ज आले़ राष्ट्रवादीकडून लिंबागणेश गटाचे सदस्य संदीप रवींद्र क्षीरसागर व युसूफवडगाव गटाचे सदस्य बजरंग मनोहर सोनवणे यांचे अर्ज दाखल झाले़
दुपारी २:२५ ते २:४० यावेळेत अर्ज मागे घ्यावयाचे होते़ दोन्हीकडूनही चार सभापतीपदासाठी प्रत्येकी एक अर्ज आले होते़ भाजपा व शिवसेनेच्या सदस्यांनी सभापतीपदांसाठी दाखल केलेले अर्ज मागे घेतले़ त्यामुळे राष्ट्रवादीकडील चारही सदस्यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला़ पीठासीन अधिकारी म्हणून अंबाजोगाईचे अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्र जगताप, संतोषकुमार देशमुख यांनी काम पाहिले़ उपमुख्य कार्यकारी अधिकारी आऱ आऱ भारती, कार्यालयीन अधीक्षक रवींद्र तुरूकमारे यांनी त्यांना सहाय्य केले़ यावेळी तगडा बंदोबस्त ठेवला होता़ जिल्हा परिषदेसमोरील सर्व दुकाने पोलिसांनी बंद केली होती़
सत्ता आल्यावर अविश्वास ठराव
भाजपाचे गटनेते मदनराव चव्हाण म्हणाले, दोन सदस्य का गैरहजर राहिले? हे सांगता येणार नाही़ राज्यात भाजपाची सत्ता येणार आहे़ सत्ता आल्यावर जिल्हा परिषदेत आमची सत्ता आणून दाखवू़ अविश्वास ठराव दाखल करुन ‘हिशेब’ बरोबर करणार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला़ (प्रतिनिधी)
निवडीची प्रक्रिया अविरोध पार पडल्याने कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेसमोर एकच जल्लोष केला़ नवनियुक्त सभापती संदीप क्षीरसागर, महेंद्र गर्जे, कमल मुंडे, बजरंग सोनवणे यांचा सत्कार झाला़
४गंगाधर घुमरे, शाहेद पटेल, पवन तांदळे, बबन गवते, फारुक पटेल, अॅड़ इरफान पठाण आदी उपस्थित होते़ निवडीनंतर पदाधिकारी व निवनियुक्त सभापती आ़ अमरसिंह पंडित यांच्या निवासस्थानी पोहोचल़े तेथेही सत्कार झाला़
आष्टी तालुक्यातील दौलावडगाव गटाचे अपक्ष सदस्य शिवाजी किसन डोके हे राष्ट्रवादीशी ‘अटॅच’ आहेत़ ते सभापतीपदासाठी आडून बसले होते़ पत्ता कट झाल्याचे समजल्यावर त्यांनी परतीचा मार्ग पकडला़ ते रागारागात शहराबाहेर गेलेही होते़ मात्र, आ़ अमरसिंह पंडित यांनी त्यांना संपर्क करुन परत बोलावले़ ‘मी येतो; पण मतदान करणार नाही’ अशी टोकाची भूमिका डोकेंनी बोलून दाखवली होती़ मात्र, आ़ पंडित यांनी त्यांची समजूत घातली त्यानंतर ‘डोके’ ताळयावर आले़ आ़ पंडित यांनी नंतर स्वत:च्या दुचाकीवर बसवून त्यांना जि़प़ च्या प्रवेशद्वाराजवळ आणून सोडले़