शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

औरंगाबादेत कचऱ्यातून ‘बायोगॅस’चे मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:06 AM

शहरातील कचºयाच्या विल्हेवाटीवर अद्याप शंभर टक्के उपाय सापडलेला नाही. त्यामुळे कच-यातून बायोगॅस निर्मिती होऊ शकते. यावर विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांच्या दालनात रविवारी मंथन करण्यात आले. इंदोर येथील संस्थेने ९० कोटी रुपयांचा डीपीआर कचरा प्रक्रियेसाठी मनपाला तयार करून दिला आहे. त्या संस्थेच्या तज्ज्ञ सदस्यांशी आज बायोगॅस निर्मितीबाबत चर्चा करण्यात आली.

ठळक मुद्देइंदोरच्या तज्ज्ञांकडून प्रस्ताव : विभागीय आयुक्तांनी घेतली कच-यासंबंधी आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील कचºयाच्या विल्हेवाटीवर अद्याप शंभर टक्के उपाय सापडलेला नाही. त्यामुळे कच-यातून बायोगॅस निर्मिती होऊ शकते. यावर विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांच्या दालनात रविवारी मंथन करण्यात आले. इंदोर येथील संस्थेने ९० कोटी रुपयांचा डीपीआर कचरा प्रक्रियेसाठी मनपाला तयार करून दिला आहे. त्या संस्थेच्या तज्ज्ञ सदस्यांशी आज बायोगॅस निर्मितीबाबत चर्चा करण्यात आली.विभागीय आयुक्तालयात कचºयासंबंधी आज आढावा बैठक झाली. बैठकीत कचºयावर प्रक्रियेसाठी निवडलेल्या जागांबाबत तपशीलवार आढावा घेण्यात आला. तसेच शहरात साचलेला कचरा उचलण्यासाठी अतिरिक्त वाहनांची व्यवस्था करण्याचे आदेशदेखील दिले. इंदोर येथून आलेल्या तज्ज्ञांसोबत बायोगॅस प्लँट आणि इतर विषयांवर सविस्तर चर्चा करताना आगामी काळात औरंगाबादेत कचºयापासून बायोगॅस निर्मिती होईल काय, यावर मंथन झाले.या बैठकीत मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, कार्यकारी अभियंता अफसर सिद्दीकी, उपायुक्त हेमंत कोल्हे, उपअभियंता ए. बी. देशमुख, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिका-यांची उपस्थिती होती. पालिकेने आज शहरातील विविध ठिकाणचा कचरा उचलला. शहागंजमधील १६ टन कचरा उचलण्यात आला. तसेच गांधीनगर भागातून पाच टन कचरा उचलला. याशिवाय टाऊन हॉल येथे सुका कचरा साठविण्यात आला होता. यापैकी ५ टन कचरा बेलिंगसाठी पाठविण्यात आला.प्रभाग क्र. ६ येथून दोन टन सुका कचरा एका कंपनीला पाठविण्यात आला. तसेच प्रभाग क्र. ७ येथील तयार १४ टन खत शेतकºयांना वाटप करण्यात आल्याचे मनपा अधिकाºयांनी बैठकीत सांगितले.जागा अतिक्रमित नाहीत ना ते पाहाकचरा प्रक्रियेसाठी निवडण्यात आलेल्या जागा अतिक्रमित आहेत काय? याचा अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी बैठकीत दिले. चिकलठाणा, कांचनवाडी, हर्सूल, पडेगाव, मिटमिटा, रमानगर या भागांतील जागांवर कोणत्या प्रकारचे आरक्षण आहे का, या जागांचे क्षेत्रफळ किती आहे, याबाबत आढावा घेऊन कम्पोस्टिंग पीटस्चे ठिकाण आणि क्षेत्र याबाबत तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले.टाऊन हॉलमधील कचरा उचललाऐतिहासिक टाऊन हॉलमध्ये मनपाच्या वॉर्ड अधिकाºयांनी सुका कचरा लपवून ठेवला होता. मनपाची ही लपवाछपवी उघड होताच रविवारी तातडीने कचरा उचलण्यात आला. टाऊन हॉलमध्ये तब्बल दहा टन कचरा साठवून ठेवण्यात आला होता. हा कचरा लिंबेजळगाव येथील एका जिनिंगमध्ये पाठविण्यात आला. तेथे सुक्या कचºयाच्या गाठी तयार करण्यात येणार आहेत. शहरात कचराकोंडी सुरू झाल्यापासून वॉर्ड अधिकाºयांना वारंवार कचरा उचलावा, अशी तंबी देण्यात होती. उचलण्यात आलेला सुका कचरा नेमका ठेवायचा कुठे असा प्रश्न पडला.चतुर अधिका-यांनीही कोणताच विचार न करता टाऊन हॉलला डम्पिंग यार्ड बनवून टाकले. दररोज जमा होणारा कचरा येथे गुपचूप आणून ठेवण्यात येत होता. तब्बल दोन महिन्यांनंतर याचे बिंग फुटले. राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांकडून ओरड सुरू झाली. सुमारे १० टन कचरा साठविण्यात आला होता. अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या आदेशावरून रविवारी वॉर्ड अधिकारी भालचंद्र पैठणे यांनी हा कचरा उचलला. टाऊन हॉलमधील कचरा ट्रकमध्ये भरून इतरत्र नेण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते.हा कचरा लिंबेजळगाव येथे जिनिंगमध्ये गाठी तयार करण्यासाठी पाठविण्यात आल्याची माहिती मनपाच्या अधिकाºयांनी दिली. महापालिकेच्या अनेक इमारतींमध्ये अशा पद्धतीने कचरा साठवून ठेवण्यात आला आहे. या मुद्यावर वॉर्ड अधिकारी, सफाई मजूर तोंड उघडायला तयार नाहीत. सिडको एन-७ भागातील मनपाच्या इमारतीतही शेकडो टन कचरा पडून आहे. आता महापौरांच्या आदेशानुसार दोन दिवसांपासून पुन्हा कचरा उचलण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. जमा करण्यात आलेला कचरा अशाच पद्धतीने कोठेही साठवून ठेवण्यात येत आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका