शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांपासून रीडिंग न घेताच बिले !

By admin | Updated: June 3, 2014 00:45 IST

रमेश कोतवाल , देवणी देवणी शहरात सध्या वीजचोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तर काही ठिकाणी अद्यापही जुने नादुरुस्त मीटर असल्यामुळे त्या मीटरमध्ये हेराफेरीचे प्रमाण वाढले आहे

रमेश कोतवाल , देवणी देवणी शहरात सध्या वीजचोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तर काही ठिकाणी अद्यापही जुने नादुरुस्त मीटर असल्यामुळे त्या मीटरमध्ये हेराफेरीचे प्रमाण वाढले आहे. तर काही ठिकाणी मीटर रीडिंग न घेताच ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिले दिली जात असल्याने ग्राहकांतून संताप व्यक्त केला जात आहे. देवणी शहरात २१०० च्या जवळपास ग्राहक आहेत. यापैकी ८०० मीटर्स हे आयआर कंपनीचे असून, त्याचे आकडे कर्मचारी घेतात. मात्र हे आकडे कॅमेर्‍यात घेतले जात नाहीत. याशिवाय ७०० मीटर चक्राकार पद्धतीने फिरणारे जयपूर कंपनीचे आहेत. यात मात्र १०० टक्के हेराफेरी करून फिरणार्‍या चक्राची गती कमी करून युनिट कमी करण्याचे प्रकार सर्रास केले जात आहेत. एका मीटरला हेराफेरी करण्याचा दर ३ हजारांपर्यंत आकारला जात आहे. तिसरा जुन्या मीटरचा प्रकार आहे. हे मीटर कालबाह्य झाले असून, ते एक तर चालत नाहीत. चालले तर डिस्प्ले गेल्याने आकडे दिसत नाहीत. शिवाय, यापैकी बरेच मीटर जळालेले आहेत. अशा मीटरची बिले महिन्याकाठी शंभराच्या आतच येत आहेत. विशेष म्हणजे असे मीटर एका गावातील वस्तीत मातब्बराच्याच घरात आहेत. असे मीटर बदलणे तर सोडाच, वीज कंपनीला हात लावणे पण अशक्य झाले आहे. गावातील मीटर बदलण्याचे टेंडर खाजगी कंपनीला दिले असल्याने मनमानी पद्धतीने मीटर बदलून परागंदा झाला आहे, आता वीज कंपनी गुत्तेदारावर ढकलत आहे. तर गुत्तेदार कंपनी मीटर देत नाही म्हणून मीटर बसवत नसल्याचे सांगत आहे. शिवाय, मीटर बसविणारे कुशल कामगार नसल्याने चुकीच्या पद्धतीने मीटर बसविल्याने बिलात तफावत येत आहे. अंदाजे बिल आकारणी... वीज मीटर व वीजगळती तथा वीजचोरीची प्रकरणे चालू असतानाच वीज कंपनी वीजबिल रिडींग घेण्याचे व वीजबिल वाटण्याची कामे खाजगी कंत्राटदाराकडून करून घेते. सदरील कंत्राटदार मजुरीवर अकुशल मुले लावून रिडींग घेतात. पण सदरील रिडींग एका ठिकाणी बसून अंदाजे टाकली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु, सदरील प्रकार गेल्या तीन महिन्यांपासून होत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये एक टोळीच सक्रिय असल्याची चर्चा देवणी शहरात आहे. याबाबत देवणी महावितरण कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता व्ही.एस. बाळापुरे यांच्याशी संपर्क साधला असता वीजबिलाचे काम खाजगी संस्थेला दिले असल्याने चुकीची बिले दिली जात असली तरी त्यात दुरुस्ती केली जात आहे.