औरंगाबादेत स्कूलबसच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 16:45 IST2018-03-05T16:04:25+5:302018-03-05T16:45:12+5:30
समर्थनगर येथे क्रांती चौक पोलीस स्टेशनजवळ स्कूल बसचा दुचाकीस धक्का बसल्याने झालेल्या अपघातात वृद्ध दुचाकीस्वार जागीच ठार झाला.

औरंगाबादेत स्कूलबसच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
औरंगाबाद : समर्थनगर येथे क्रांती चौक पोलीस स्टेशनजवळ स्कूल बसचा दुचाकीस धक्का बसल्याने झालेल्या अपघातात वृद्ध दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना आज दुपारी २.३० वाजेच्या दरम्यान झाली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, लहाणु घुगे (५३ ) हे अदालत रोडकडून आपल्या दुचाकीवर (एएच २० - डीएन - ३००१ ) निराला बाजारकडे जात होते. ते क्रांती चौक पोलीस स्टेशन जवळील चौकात आले असता एक स्कूल बस ( एमएच -२०.एए-२२८८ ) त्यांच्या पुढे निघाली. या दरम्यान स्कूल बसच्या मागील बाजूचा धक्का घुगे यांच्या दुचाकीला बसला. यामुळे ते तोल जाऊन खाली कोसळले. यात त्यांचे हेल्मेट तुटले व त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व अतीव रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृत घुगे जिल्हा परिषद कर्मचारी होते. पोलिसांनी बसचालक पुंडलिक नरवडे यास अटक केली आहे.