भरधाव दुचाकी ट्रकवर आदळून दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 18:23 IST2018-10-19T18:23:10+5:302018-10-19T18:23:50+5:30
भरधाव दुचाकी बंद पडलेल्या ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात आंध्र प्रदेशातील दोन तरुण जागीच ठार झाले ही घटना गुरुवारी रात्री पावणेबारा वाजता औरंगाबाद-जालना मार्गावर नगुणीचीवाडी फाट्याजवळ घडली.

भरधाव दुचाकी ट्रकवर आदळून दोन ठार
करमाड : भरधाव दुचाकी बंद पडलेल्या ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात आंध्र प्रदेशातील दोन तरुण जागीच ठार झाले ही घटना गुरुवारी रात्री पावणेबारा वाजता औरंगाबाद-जालना मार्गावर नगुणीचीवाडी फाट्याजवळ घडली. व्यंकट पितय्या अंजमा कीर्ती (२५) व व्यंकटेश्वर रेड्डी व्यंकट सिंघमरेड्डी (२७)असे मृतांची नावे आहेत.
जालन्याहून व्यंकट रेड्डी व व्यंकटेश्वर हे गुरुवारी रात्री पावणेबारा वाजता दुचाकीने (ए.पी.२७ बी झेड ६०२) औरंगाबादकडे येत होते. नगुणीचीवाडी फाट्याजवळ ट्रक (एम.एच.२०डी इ ४८५३) हा नादुरुस्त झाल्याने रस्त्यावर उभा होता. यावेळी रस्त्यावरील ट्रक लक्षात न आल्याने भरधाव दुचाकी त्यावर आदळली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना औरंगाबाद येथील घाटी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी दोघांना तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रदीप भिवसने, जमादार रमेश धस करीत आहे.