शहरातील सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा आज

By Admin | Updated: July 27, 2014 01:19 IST2014-07-27T00:59:34+5:302014-07-27T01:19:40+5:30

औरंगाबाद : शालेय विद्यार्थी आपल्यातील चित्रकलेचे कौशल्य दाखविण्यासाठी आतुर झाले आहेत.

The biggest painting competition in the city today | शहरातील सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा आज

शहरातील सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा आज

औरंगाबाद : शालेय विद्यार्थी आपल्यातील चित्रकलेचे कौशल्य दाखविण्यासाठी आतुर झाले आहेत. कारण, लोकमत टाइम्स कॅम्पस क्लबच्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धेत शहरातील हजारो विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी केली आहे आणि तो क्षण जवळ आला असून, उद्या रविवार, दि.२७ जुलै रोजी शहरातील सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे.
कॅम्पस क्लबचा २०१४-२०१५ वर्षाचा सदस्यच या स्पर्धेत भाग घेऊ शकतो. सकाळी १० वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्पर्धा तीन गटांत होणार असून, यात गट ‘अ’मध्ये इयत्ता पहिली ते चौथी, गट ‘ब’मध्ये इयत्ता पाचवी ते सातवी व गट ‘सी’मध्ये इयत्ता आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. स्पर्धा झोननिहाय विविध शाळांमध्ये होणार आहे. यात ज्ञानदा स्कूल, रायन इंटरनॅशनल स्कूल, तनवाणी इंग्लिश स्कूल, तापडिया इनोव्हेशन स्कूल, स्वामी विवेकानंद अकॅडमी, एजीपी पब्लिक स्कूल, आॅर्चिड स्कूल, शांतीनिकेतन पब्लिक स्कूल व पोदार इंटरनॅशनल स्कूल तसेच लोकमत भवन येथे चित्रकला स्पर्धा होणार आहे. स्पर्धेसाठी आवश्यक असणाऱ्या ड्रॉइंग शीट लोकमत कॅम्पस क्लबकडून देण्यात येणार आहेत. स्पर्धकाला सहभागाचे प्रमाणपत्र व विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी ९०११४९८७७९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कॅम्पस क्लबने केले आहे.

Web Title: The biggest painting competition in the city today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.