छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज निवडणूक पार पडणार आहे. या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत उद्धवसेनेने आपली भूमिका जाहीर केली. ठाकरेंची शिवसेना या निवडणुकीत कोणालाही मतदान करणार नसून तटस्थ राहण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे, अशी माहिती उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी दिली.
अंबादास दानवे म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे ६ नगरसेवक आहेत. पक्षाच्या आदेशानुसार, आमचे नगरसेवक महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी होणार असले तरी ते कोणालाही मतदान करणार नाहीत. आम्ही तटस्थ राहून या प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहोत. महानगरपालिकेत भाजप आणि शिंदेसेनाविरुद्ध महाविकास आघाडीतील इतर पक्ष अशी थेट लढत पाहायला मिळत आहे. मात्र, महाविकास आघाडीचा घटक पक्ष असूनही ठाकरे गटाने घेतलेल्या या वेगळ्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
नुकत्याच पार पडलेल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत एकूण ११५ जागांपैकी भाजपने सर्वाधिक ५७ जागा जिंकल्या आहेत. तर, तर महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिंदेसेनेने १३ जागांवर यश मिळवले. दुसरीकडे, ३३ जागा जिंकून 'इतर' आणि अपक्ष उमेदवारांनीही आपली ताकद दाखवून दिली आहे. भाजपने ५७ जागा जिंकून बहुमताच्या अगदी जवळ मजल मारली आहे. शिंदेसेनेच्या १३ जागांच्या साथीने महायुतीकडे आता ७० जागांचे स्पष्ट संख्याबळ झाले आहे.
Web Summary : In Chhatrapati Sambhajinagar, Shiv Sena UBT will abstain from voting in the mayoral election despite being part of the Maha Vikas Aghadi. With 6 corporators, they'll remain neutral, impacting the BJP-Shinde Sena versus other parties contest. BJP leads with 57 seats.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर में, शिवसेना यूबीटी महापौर चुनाव में मतदान नहीं करेगी, जबकि वह महा विकास अघाड़ी का हिस्सा है। 6 पार्षदों के साथ, वे तटस्थ रहेंगे, जिससे भाजपा-शिंदे सेना बनाम अन्य दलों के मुकाबले पर असर पड़ेगा। भाजपा 57 सीटों के साथ आगे है।