सेलू (जि. परभणी): सेलू तालुक्यातील खवणे पिंपरी येथील एका शेतातील गोडावूनमधून ५५ गॅस सिलिंडर चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला आहे. चोरट्यांनी गोडावूनचे शटर तोडून ५५ सिलिंडरसह एक चारचाकी अॅपे वाहन आणि लॅपटॉप चोरून नेला आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागातील गॅस वितरकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पाथरी पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खवणे पिंपरी येथे 'रुही इंडियन गॅस एजन्सी'चे गोडावून मधुकर चव्हाण यांच्या शेतात भाड्याने घेतलेल्या जागेत आहे.
रात्रीच्या सुमारास शटर तोडून डल्लाशनिवारी रात्री गोडावूनला कोणीही नसताना चोरट्यांनी संधी साधली. गोडावूनमध्ये एकूण १३० सिलिंडरचा साठा होता, त्यापैकी चोरट्यांनी ५५ सिलिंडर लंपास केले. केवळ सिलिंडरच नाही, तर तिथे असलेले वाहन आणि महत्त्वाचा डेटा असलेला लॅपटॉपही चोरून नेला आहे. रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास जेव्हा कर्मचारी गोडावूनवर पोहोचले, तेव्हा शटर तुटलेले दिसल्याने हा प्रकार समोर आला.
पाथरी पोलिसांत धावया एजन्सीचा परवाना प्रणव परळीकर (रा. परळी) यांच्या नावे असून, या माध्यमातून खवणे पिंपरी, देऊळगाव गात, गुगळी धामणगाव आणि लाडनांदरा या ग्रामीण भागांत गॅस वितरण केले जाते. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील गणेश पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. या चोरीप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद देण्यात आली असून, पोलीस आता चोरट्यांचा शोध घेत आहेत.
गॅस टंचाईच्या काळात चोरीचे संशयास्पद वळणसध्या बाजारपेठेत गॅस सिलिंडरची मागणी मोठी असताना, एवढ्या मोठ्या प्रमाणात सिलिंडर चोरीला जाणे हे एखाद्या संघटित टोळीचे काम असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चोरीला गेलेले वाहन कोणत्या दिशेला गेले, याचा तपास करण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची मदत घेत आहेत.
Web Summary : A daring theft occurred in Parbhani district's Selu, where 55 gas cylinders, a four-wheeled vehicle, and a laptop were stolen from a gas agency godown. Pathari police are investigating this major incident.
Web Summary : परभणी जिले के सेलू में एक गैस एजेंसी के गोदाम से 55 गैस सिलेंडर, एक चार पहिया वाहन और एक लैपटॉप चोरी हो गया। पाथरी पुलिस इस बड़ी घटना की जांच कर रही है।