भाविकांना मोठा दिलासा, महाशिवरात्रीनिमित्त औरंगाबादहून वेरूळसाठी ३० सिटीबसचे नियोजन
By मुजीब देवणीकर | Updated: February 17, 2023 14:48 IST2023-02-17T14:48:42+5:302023-02-17T14:48:51+5:30
मध्यवर्ती बसस्थानक ते वेरुळ दर पाच मिनिटाला बस उपलब्ध असेल

भाविकांना मोठा दिलासा, महाशिवरात्रीनिमित्त औरंगाबादहून वेरूळसाठी ३० सिटीबसचे नियोजन
औरंगाबाद:महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी वेरूळ येथील ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी रीघ लागते. औरंगाबादहून देखील अनेक भक्त दर्शनासाठी वेरूळला जातात. येथील भाविकांच्या सोयीसाठी स्मार्ट सिटीबसतर्फे ३० बसेस उद्या औरंगाबाद ते घृष्णेश्वर धावणार आहेत.
महाशिवरात्रीनिमित्त वेरुळसाठी औरंगाबाद स्मार्ट शहरबस विभागातर्फे ३० बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. या बस सिडको, टीव्ही सेंटर, हर्सूल टी पॉइंट, हडको कॉर्नर, रेल्वे स्टेशन येथून उपलब्ध असणार आहेत. मध्यवर्ती बसस्थानक ते वेरुळ दर पाच मिनिटाला बस उपलब्ध असणार आहेत. यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.