मोठी बातमी: विद्यापीठाच्या कुलसचिव जयश्री सुर्यवंशी यांचा राजीनामा

By संतोष हिरेमठ | Updated: October 11, 2022 10:29 IST2022-10-11T10:28:52+5:302022-10-11T10:29:29+5:30

कुलगुरू यांनी राजीनामा मंजूर केला आहे.

Big News: Dr. Babasaheb Ambedkar University's registar Jayashree Suryavanshi resigns | मोठी बातमी: विद्यापीठाच्या कुलसचिव जयश्री सुर्यवंशी यांचा राजीनामा

मोठी बातमी: विद्यापीठाच्या कुलसचिव जयश्री सुर्यवंशी यांचा राजीनामा

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिवपदाचा डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी राजीनामा दिला आहे. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी हा राजीनामा मंजूर केला आहे.

विद्यापीठातील संवैधानिक असलेल्या कुलसचिवपदाचा डॉ. सूर्यवंशी यांनी सोमवारी सायंकाळी राजीनामा दिला. याला डॉ. सूर्यवंशी यांनी दुजोरा दिला.  या पदाचा राजीनामा दिला असून यापुढे वाणिज्य विभागात कार्यरत राहू, असे त्यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. राजीनाम्याचे कारण अद्याप पुढे आले नाही. दरम्यान, सुर्यवंशी यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आले होते. हे प्रकरण न्यायालयात देखील गेले होते. 

Web Title: Big News: Dr. Babasaheb Ambedkar University's registar Jayashree Suryavanshi resigns