शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! अर्जुन खोतकर यांची आमदारकी कायम; खंडपीठाचा कैलास गोरंट्याल यांना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 20:22 IST

जालना विधानसभा २०२४ ची विधानसभा सार्वत्रिक निवडणूक: आमदारकीला आव्हान देणारी गोरंट्याल यांची याचिका खंडपीठाने फेटाळली

छत्रपती संभाजीनगर : २०२४ च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत जालना विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले आमदार अर्जुन खोतकर यांच्या निवडीस आव्हान देणारी कैलास गोरंट्याल यांनी दाखल केलेली ‘निवडणूक याचिका’ मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती किशोर सी. संत यांनी सोमवारी (दि. ३०) फेटाळली.

वरील निवडणुकीत अर्जुन खोतकर एक लाख ४ हजार मते मिळवून विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांचा ३१ हजार मतांनी पराभव केला होता.

याचिकेतील महत्त्वाचे मुद्देखोतकर जालना बाजार समितीचे मुख्य प्रशासक हे लाभाचे पद धारण करीत असल्याने ते विधानसभा निवडणूक लढवण्यास अपात्र आहेत. खोतकर यांनी नामनिर्देशन पत्रासोबत दाखल केलेले शपथपत्र विहित नमुन्यात नव्हते. निवडणूक आयोगाने नियमांचे उल्लंघन करून निवडणूक घेतली, ज्यामुळे खोतकर यांना फायदा झाला. या कारणांमुळे खोतकर यांची निवडणूक अवैध असून त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी विनंती गोरंट्याल यांनी केली होती.

खोतकर यांच्यातर्फे युक्तिवादयाचिकेत खोतकर यांनी दिवाणी प्रक्रिया संहिता आदेश ७ नियम ११ नुसार अर्ज करून गोरंट्याल यांनी उपस्थित केलेल्या एकाही मुद्द्यात तथ्य नाही, त्यामुळे त्यांची याचिका प्राथमिक टप्प्यावरच रद्द करावी, अशी विनंती केली होती. आपल्या अर्जात खोतकर यांनी असे मुद्दे मांडले होते की, बाजार समिती ही ‘स्थानिक स्वराज्य संस्था’ असल्याने त्यात धारण केलेले कुठलेही पद हे राज्यघटनेच्या अनुच्छेद १९१ नुसार लाभाच्या पदाच्या व्याख्येत येत नाही, असा युक्तिवाद ज्येष्ठ विधिज्ञ संजीव देशपांडे यांनी केला. त्यांनी संविधान सभेतील चर्चेचा आधार घेत न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, एखाद्या व्यक्तीने स्थानिक स्वराज्य संस्थेतील धारण केलेले पद त्या व्यक्तीस विधानसभा निवडणूक लढविण्यास अपात्र करत नाही, अशी अपात्रता केवळ राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीसाठी असते. खोतकर यांचे नामनिर्देशन पत्रासोबतचे शपथपत्र विहित नमुन्यात आहे. त्यांनी संपूर्ण माहिती जनतेला दिलेली आहे. निवडणूक आयोगावर गोरंट्याल यांनी केलेले आरोप निराधार व बिनबुडाचे असून त्यांच्या पुष्ट्यर्थ त्यांनी एकही पुरावा दिलेला नाही. खोतकर यांच्यातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ संजीव देशपांडे यांनी बाजू मांडली व त्यांना ॲड. सुबोध शाह व ॲड. प्रतीक भोसले यांनी सहकार्य केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Arjun Khotkar's MLA status upheld; blow to Kailas Gorantyal.

Web Summary : The Aurangabad bench dismissed Kailas Gorantyal's plea challenging Arjun Khotkar's victory. Court cited lack of merit in claims regarding Khotkar's eligibility and election process.
टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरShiv SenaशिवसेनाJalanaजालनाHigh Courtउच्च न्यायालय