शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

महापालिकेच्या सोडतीत एस. टी. प्रवर्गाच्या वार्ड आरक्षणातही मोठा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 12:19 PM

२०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार महापालिकेला शहरातील ११५ वॉर्डांमध्ये एस.टी. प्रवर्गासाठी दोन वॉर्ड आरक्षित करायचे होते.

ठळक मुद्देवॉर्ड रचना करतानाच लोकसंख्येत फेरबदलआक्षेप व हरकतींचा महापालिकेच्या निवडणूक विभागावर पाऊस

औरंगाबाद : महापालिकेच्या आरक्षण सोडतीवर प्रचंड संशयकल्लोळ निर्माण झालेला असतानाच झारीतील शुक्राचार्यांनी अनुसूचित जमातीच्या (एस.टी.) वॉर्ड आरक्षणातही मोठ्या प्रमाणात घोळ केल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. नवाबपुरा वॉर्ड एस.टी. प्रवर्गात जाऊ नये म्हणून वॉर्ड रचना तयार करतानाच या वॉर्डातील एस.टी.ची लोकसंख्या कमी करण्यात आली. नवाबपुऱ्यावर आलेले संकट रोजेबाग वॉर्डावर नेण्यात आले.

२०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार महापालिकेला शहरातील ११५ वॉर्डांमध्ये एस.टी. प्रवर्गासाठी दोन वॉर्ड आरक्षित करायचे होते. एस.टी. प्रवर्गाची लोकसंख्या कोणत्या वॉर्डात किती आहे, याचे आकडेही मनपाकडे उपलब्ध होते. उतरत्या क्रमाने दोन वॉर्डांमध्ये आरक्षण टाकायचे होते. लोकसंख्येचा निकष लावला, तर वॉर्ड क्रमांक ३ एकतानगर अनुसूचित जातीसाठी राखीव होण्यास ४५७ लोकसंख्या होती. त्या खालोखाल नवाबपुरा वॉर्डाची लोकसंख्या ४२५ होती. हा वॉर्ड थेट एस.टी. प्रवर्गात जात असल्याचे वॉर्ड रचना तयार करणाऱ्यांच्या लक्षात आले. महापालिकेत पूर्वाश्रमीचा कंत्राटदार असलेल्या एका विद्यमान नगरसेवकाचे या वॉर्डात पुनर्वसन करायचे होते, अशा कठीण परिस्थितीत अधिकारीही मिठाला जागले. त्यांनी नवाबपुरा वॉर्डातील तेलंगवाडा हा परिसर थेट कैसर कॉलनीत टाकला. तेलंगवाडा येथील एस.टी. प्रवर्गाचे मतदान कमी करण्यात आले. नव्याने तयार करण्यात आलेल्या नवाबपुरा वॉर्डात एस.टी.ची लोकसंख्या २०४ वर आणण्यात आली. त्यामुळे हा वॉर्ड आरक्षित होत नव्हता.

अखेर दुसरा कोणता वॉर्ड आरक्षित करायचा यावर मंथन झाले. शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक मोहन भैया मेघावाले यांच्या रोजेबाग वॉर्डात एस.टी. प्रवर्गाची लोकसंख्या ३२९ होती. त्यामुळे थेट या वॉर्डावर आरक्षण टाकण्यात आले. आता एवढे सर्व ढळढळीत पुरावे उपलब्ध झाल्यानंतरही वॉर्ड रचना, वॉर्ड आरक्षण ‘सब कुछ मॅनेज’नाही, असे म्हणताच येणार नाही. उलट एस. टी. प्रवर्गाचे आरक्षण टाकताना मॅनेज कशा पद्धतीने केले होते याचा हा पुरावाच म्हणावा लागेल.

सहा किलोमीटरचा कुठे वॉर्ड असतो का...?महापालिकेने तयार केलेल्या नवीन वॉर्ड रचनेवर आता विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. वॉर्डांच्या सीमा बदलताना निवडणूक आयोगाने दिलेले निर्देशही पाळण्यात आले नाहीत. भीमनगर उत्तर या वॉर्डाला तब्बल सहा किलोमीटर अंतरावर असलेला पहाडसिंगपुरा, हनुमान टेकडी हा भाग जोडण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. सहा किलोमीटरचा कुठे वॉर्ड असतो का? असेही आक्षेपकर्त्याने नमूद केले.माजी नगरसेवक कृष्णा बनकर यांनी दाखल केलेल्या आक्षेपात नमूद केले की, भीमनगर उत्तर या वॉर्डाच्या सीमा जुन्याच पद्धतीने योग्य होत्या. नव्या प्रारूप आराखड्यात या वॉर्डाला हनुमान टेकडी, बीबीका मकबरा पाठीमागील भाग जोडण्यात आला आहे. हे अंतर तब्बल सहा किलोमीटर एवढे आहे. 

रिपाइं आठवले गटातर्फे आक्षेप सादर करण्यात आला आहे. त्यात वॉर्ड क्रमांक ८१ संजयनगरमधून वगळून वॉर्ड क्रमांक ८७ मध्ये जोडण्यात आलेल्या एक ते सहा नंबरच्या गल्ल्या पुन्हा वॉर्ड क्रमांक ८१ मध्ये जोडण्यात याव्यात! राजकीय हस्तक्षेपामुळे या गल्ल्या जोडण्यात आल्या असून, या भागात अनुसूचित जातीचे ९०  टक्के लोक राहतात, असे आक्षेपात नमूद केले आहे. 

सोडत, वॉर्ड रचनेवर २९ आक्षेप दाखलमहापालिका प्रशासनाने तयार केलेली वॉर्ड रचना, सोडतीवर औरंगाबादकर तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. दोन दिवसांमध्ये महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे तब्बल २९ आक्षेप दाखल झाले आहेत. बुधवारी दिवसभरात सर्वाधिक २३ आक्षेप आले. ११ फेब्रुवारीपर्यंत आक्षेप स्वीकारण्यात येणार आहेत. येणाऱ्या काही दिवसांमध्ये आक्षेपांचा अक्षरश: महापूर येणार हे निश्चित. काही नगरसेवकांनी सोयीचा वॉर्ड तयार करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केल्याची चर्चाही आता मनपात जोर धरत आहे.मंगळवारपासून महापालिकेच्या निवडणूक विभागात आक्षेप व हरकती स्वीकारण्यास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ६ आक्षेप दाखल झाले होते. बुधवारी तब्बल २३ आक्षेप दाखल झाले. वॉर्ड रचना तयार करतानाच विशिष्ट लोकप्रतिनिधी डोळ्यासमोर ठेवून, पुढील महापौर आरक्षण लक्षात घेऊन सोय करण्यात आली आहे. सेना, भाजप, एमआयएम, काँग्रेस पक्षातील काही विद्यमान नगरसेवकांची खास काळजी घेतली आहे. महापालिकेतील सर्वच राजकीय पक्षांच्या फक्त २० नगरसेवकांसाठी पन्नास टक्क्यांहून अधिक वॉर्ड फोडण्यात आले आहेत.

आयोगाने ८५ सुधारणा कोणत्या केल्यामहापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी राजकीय मंडळींची मर्जी राखण्यासाठी वॉर्ड रचना तयार केली. आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यात तब्बल ८५ सुधारणा केल्याची माहिती समोर येत आहे. वॉर्ड रचना, आरक्षण सोडत अंगलट येऊ लागल्याने मनपा प्रशासन आम्ही काहीच केले नाही, सर्व काही आयोगाने केले असे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे.

एस. टी. वॉर्डांचा तपशीलवॉर्ड    लोकसंख्या०३-एकतानगर    ४५७१३-रोजेबाग    ३३९४९- नवाबपुरा    २०४४६- नवाबपुरा     ४२५       (जुना वॉर्ड

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादElectionनिवडणूक