शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोठी संधी! लवकरच अत्यंत कमी कागदांत करा गुंठेवारी नियमितीकरण

By मुजीब देवणीकर | Updated: July 15, 2023 19:49 IST

गुंठेवारी नियमितीकरणाची मोहीम राबविण्याची नागरिकांकडून वारंवार मागणी

छत्रपती संभाजीनगर : शहरात किमान १ लाखाहून अधिक घरे गुंठेवारीअंतर्गत येतात. मात्र, तांत्रिक अडचणी, गुंठेवारीचे अवाढव्य शुल्क बघता नागरिकांनी या योजनेला फारसा प्रतिसाद दिला नाही. १० हजार घरांचीच गुंठेवारी करता आली. त्यातून मनपाला सव्वाशे कोटींचा घसघशीत निधी मिळाला. आता गुंठेवारी नियमितीकरणासाठी समाधान शिबिर घेतले जाणार असून, त्यासाठी मालमत्ताधारकांना कमीत कमी कागदपत्रे लागतील, याचा आराखडा तयार करण्याचे आदेश मनपा प्रशासक तथा आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिले.

महाविकास आघाडी सरकारने डिसेंबर २०२० पर्यंतची अनधिकृत घरे नियमित करण्यासाठी गुंठेवारी कायद्याला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. महापालिकेने ९ जुलै २०२१ पासून गुंठेवारी नियमितीकरणाची प्रक्रिया सुरू केली. शहरातील ५१ वास्तुविशारदांचे पॅनल तयार करण्यात आले. रेडिरेकनर दराच्या ५० टक्के शुल्क आकारणी करून दीड हजार चौरस फुटांच्या आतील अनधिकृत बांधकामे नियमित केले जात होते. दीड वर्षाच्या काळात सुमारे ९ हजार ९५२ घरे गुंठेवारी कायद्यानुसार नियमित करण्यात आली. त्यानंतर शुल्क आकारणीची सवलत रद्द करण्यात आली. त्यामुळे गुंठेवारी करण्यासाठी दाखल होणाऱ्या संचिकांचे प्रमाण देखील कमी झाले. गुंठेवारीतून महापालिकेला १२५ कोटी रुपयांचे उत्पन्न देखील मिळाले.

गुंठेवारी नियमितीकरणाची मोहीम राबविण्याची मागणी वारंवार नागरिकांकडून केली जात असली तरी मनपाकडून त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पूर्वीप्रमाणे ५० टक्के शुल्क ठेवावे, असेही नागरिकांचे म्हणणे आहे. मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी शहरातील गुंठेवारी भागाचा अभ्यास करून गोरगरीब नागरिकांची घरे नियमित करण्याच्या दृष्टीने गुंठेवारी समाधान शिबिर घेण्यासाठी नगररचना विभागाने कमीत कमी कागदपत्रे लागतील, याचा आराखडा तयार करून सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

योजनेचे फायदेगुंठेवारी योजनेसाठी पूर्वी विविध कागदपत्रांची मागणी करण्यात येत होती. कमीत कमी कागदपत्रे घेऊन गुंठेवारी करण्याचे धोरण मनपाने स्वीकारले तरी कोणती कागदपत्रे मनपाला सादर करावी लागतील, असा प्रश्न नागरिकांना पडतो. नगर रचना विभागातील सूत्रांनी सांगितले की, गुंठेवारीसाठी प्लॉट, घर असेल तर मालकी हक्काचा पुरावा, ३१ डिसेंबर २०२० पूर्वीची ही मालमत्ता आहे का?, १०० रुपयांच्या बॉन्ड पेपरवर शपथपत्र, मनपाचा एक स्वीकृती फॉर्म भरून घेतला जातो.

योजनेचे धोके कोणते ?कमीत कमी कागदपत्र घेतल्यास एखादा प्लॉटधारक बाहेरगावी राहत असेल त्याचे प्लॉट तिसऱ्याच व्यक्तीने २०१९ च्या बॉन्ड पेपरवर विकले तर मनपा गुंठेवारी तर करून देईल. मात्र, मूळ मालकावर अन्याय होईल. २०२३ मध्ये एकाने बॉन्डवर घर, प्लॉट घेतला. पूर्वी तो कोणत्या मालकाकडे होता, त्याची लिंक तपासणे आवश्यक आहे. अन्यथा बोगसगिरी अधिक होऊ शकते.

१ हजार कोटींचे उद्दिष्टगुंठेवारी योजना सुलभ करून किमान ७५ हजार घरे नियमित करण्याचे उद्दिष्ट मनपाने डोळ्यांसमोर ठेवले असून, त्यातून १ हजार कोटींचा महसूल मिळेल, असा अंदाज बांधण्यात आला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका