Big Breaking : प्राध्यापक डॉ. राजन शिंदेंच्या खुनाचं गूढ उकललं; विधीसंघर्षग्रस्त बालक अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 13:16 IST2021-10-18T13:15:17+5:302021-10-18T13:16:31+5:30
Dr. Rajan Shinde murder case : सर्व शस्त्र सापडताच तत्काळ एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Big Breaking : प्राध्यापक डॉ. राजन शिंदेंच्या खुनाचं गूढ उकललं; विधीसंघर्षग्रस्त बालक अटकेत
औरंगाबाद : बहुचर्चित प्रा. डॉ. राजन शिंदे यांच्या खुनाच रहस्य ( Dr. Rajan Shinde murder case : ) उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. आज सकाळी डॉ. शिंदे यांच्या घराच्या जवळच असलेल्या विहिरीतून खुनासाठी वापरण्यात आलेले शस्त्र ( Murder Weapon ) पोलिसांना सापडले. यात व्यायामाचा एक डंबेल्स, स्वयंपाक घरातील चाकू याचा समावेश आहे. डॉ. राजन यांच्या डोक्यात संशयित आरोपीने डंबेल्स मारले आणि त्यानंतर चाकूने गळा व हाताच्या नसा कापल्या या निष्कर्षापर्यंत पोलीस आले आहेत. सर्व शस्त्र सापडताच तत्काळ विधीसंघर्षग्रस्त बालकाला ( Juvenile accused arrested) पोलिसांनी ताब्यात घेतले. तब्बल ७ दिवसांनंतर पोलिसांनी सबळ पुरावे जमा करत ही कारवाई केली.
हायप्रोफाईल वस्तीतील प्राध्यापक डॉ. राजन शिंदे यांचा त्यांच्या घरात डोक्यात वार करून नंतर गळा, हाताच्या नसा कापून दि. ११ रोजी खुन करण्यात आला होता. या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. अत्यंत गुंतागुंतीच्या या प्रकरणाचा तपास पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी स्वतःकडे घेतला. विविध पथके नेमून सर्व तांत्रिक पुरावे हस्तगत करण्यात आले. दरम्यान, एका संशियाताने दिलेल्या माहितीवरून घराच्या जवळील विहिरीत खुनासाठी वापरण्यात आलेल्या शस्त्राचा पोलीसांनी शोध घेतला.
विहिरीतील पाणी आणि गाळ काढल्यानंतर तीन दिवसांनी आज सकाळी खुनासाठी वापरण्यात आलेली शस्त्रे सापडली. यात व्यायामासाठी वापरायचे अंदाजे ५ किलोचे डंबेल, एक धारदार चाकू आणि रक्त पुसलेले टॉवेल याचा समावेश आहे. सर्व शस्त्र सापडतच पोलिसांनी तत्काळ विधीसंघर्षग्रस्त बालकाला अटक केली. डॉ. राजन यांच्या डोक्यात डंबेल्स मारले आणि त्यानंतर चाकूने गळा व हाताच्या नसा कापल्या या निष्कर्षापर्यंत पोलीस आले आहेत. विधीसंघर्षग्रस्त बालकाला विहिरीजवळ आणून पंचनामा करण्यात आला. यानंतर त्याला बाल न्याय मंडळात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाबाबत अधिक माहिती पोलीस पत्रकार परिषद घेऊन देणार असल्याची माहिती आहे.
तो हिटलर होता, म्हणून संपविला एकदाचा
घटनेच्या पाचव्या दिवशी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या संशयितांनी खुनाबद्दल पोलिसांकडे पहिल्यांदाच कबुली दिली. त्यावरून मुख्य संशयिताची चौकशी करण्यात आली. त्यानेही खून केल्याचे कबूल करून त्यासाठी वापरलेले शस्त्र सिडको एन २ येथील महापालिकेच्या जागेतील विहिरीत टाकल्याचे सांगितले. तो हिटलर होता, म्हणून संपविला एकदाचा असे संशयिताने म्हटल्याचे समजतेय.
'तो हिटलर होता, म्हणून संपविला एकदाचा'; डॉ. राजन शिंदे खून प्रकरणात संशयितांकडून कबुली