मतदार जागृतीसाठी सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 22:31 IST2019-04-21T22:30:50+5:302019-04-21T22:31:03+5:30
जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, असा संदेश देत रविवारी सकाळी क्रांतीचौक येथून सायकल रॅली काढण्यात आली.

मतदार जागृतीसाठी सायकल रॅली
औरंगाबाद : मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. हे कर्तव्य सर्व सुजाण नागरिकांनी बजावले पाहिजे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, असा संदेश देत रविवारी सकाळी क्रांतीचौक येथून सायकल रॅली काढण्यात आली.
‘राईड फॉर डेमोक्रॅसी’ ही थीम घेऊन काढण्यात आलेल्या सायकल रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या हस्ते झाले. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंगल यांची उपस्थिती होती. हर्सूल टी पॉइंट ते परत क्रांतीचौक अशी २० कि.मी. अंतर या रॅलीने सर केले. रॅलीत सुमारे १५० सायकलस्वार नागरिक सहभागी झाले होते.
रॅली यशस्वी करण्यासाठी जि. प. महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले यांनी परिश्रम घेतले