शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा इच्छुकांची फुलंब्रीत भाऊगर्दी

By admin | Updated: August 18, 2014 00:38 IST

साधी विरोधी पक्षाची भूमिकाही निटनेटकी बजावता न आलेल्या भाजपामध्ये केवळ सोशल मीडियाच्या भरवशावर तब्बल दीड डझन उमेदवार इच्छुकांच्या यादीत जमा झाले आहेत.

फुलंब्री : गेली दहा वर्षे मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहे. या काळात साधी विरोधी पक्षाची भूमिकाही निटनेटकी बजावता न आलेल्या भाजपामध्ये केवळ सोशल मीडियाच्या भरवशावर तब्बल दीड डझन उमेदवार इच्छुकांच्या यादीत जमा झाले आहेत. हे सर्व इच्छुक उमेदवार स्वतंत्ररीत्या मतदारसंघात फिरून आपणच उमेदवार असल्याचे भासवित आहेत. यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. गेल्या दोन्ही पंचवार्षिकमध्ये पराभव पचनी पडलेल्या भाजपाची यंदाच्या निवडणुकीतही फार आघाडी आहे, असे नाही. तरीही विधानसभा लढविण्याची इच्छा असणाऱ्यांची संख्या तब्बल अठरापर्यंत पोहोचली आहे. येथे इच्छुकच तेवढे आहेत, काम मात्र एकाचेही दिसून येत नाही. इच्छुक असणाऱ्या एकाही उमेदवाराने पक्ष वाढविणे, मेळावे, शाखा उघडण्यासारखी कामेही केलेली नाहीत. केवळ सोशल मीडियाच्या भरवशावर आपण निवडून येऊ ही एकच आशा या इच्छुकांना आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही मोदी फॅक्टर चालेल आणि आपण या लाटेत आमदार होऊन जाऊ, या आशेवरच अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. भाजपाच्या इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी एवढी झाली आहे की, आज एका गावात एक उमेदवार कार्यकर्त्यांसह येऊन गेला की दुसऱ्या दिवशी दुसरा उमेदवार आपल्या समर्थकांना घेऊन येतो आणि आश्वासनांची खैरात वाटून जातो. हा प्रकार मागील महिनाभरापासून जोरात सुरू आहे. उमेदवारी मिळविण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करीत आहे. प्रत्येक इच्छुकाने आपापली वेगळी चूल मांडल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत.