Bharat Bandh : 'मोदी सेठ, इंधन दरवाढीबद्दल धन्यवाद'; औरंगाबादेत मनसेने उभारला सेल्फी पॉइंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 12:51 IST2018-09-10T12:47:11+5:302018-09-10T12:51:29+5:30
इंधन दरवाढी विरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने क्रांती चौकात निदर्शने केली.

Bharat Bandh : 'मोदी सेठ, इंधन दरवाढीबद्दल धन्यवाद'; औरंगाबादेत मनसेने उभारला सेल्फी पॉइंट
औरंगाबाद : इंधन दरवाढी विरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने क्रांती चौकात निदर्शने केली. यावेळी मनसे आंदोलकांनी वाहनधारकांना ड्रॉपने थेंब थेंब पेट्रोल वाटप करत इंधन दरवाढीचा निषेध केला.
तसेच याठिकाणी मनसेने एक फोटो पॉइंटसुद्धा उभारला आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या छायाचित्रासह 'मोदी सेठ इंधन दरवाढीबद्दल धन्यवाद' असा मजकूर लिहण्यात आला आहे. येथे अनेकांनी सेल्फी काढली.
आंदोलनात जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर,गौतम आमराव, संदीप कुलकर्णी, बिपीन नाईक, शहराध्यक्ष सतनासिंग गुलाटी,आशिष सुरडकर, प्रवीण मोहिते आदींचा सहभाग होता.