शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

उदंड जाहले संशोधक!

By admin | Updated: November 19, 2014 01:01 IST

विजय सरवदे , औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आंतरराष्ट्रीय दर्जाचे नावीन्यपूर्ण संशोधन व्हावे, यासाठी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी चांगली भूमिका घेतली असली

विजय सरवदे , औरंगाबादडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आंतरराष्ट्रीय दर्जाचे नावीन्यपूर्ण संशोधन व्हावे, यासाठी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी चांगली भूमिका घेतली असली तरी दुसरीकडे मात्र संशोधक विद्यार्थ्यांच्या तुलनेत गाईडची मोठी वानवा आहे. विद्यापीठात सध्या नव्या नियमानुसार ७५९ गाईड असून ‘पेट-३’ उत्तीर्णांची संख्या ३ हजार ४६७ एवढी आहे. शिवाय संशोधनासाठी दावा करणाऱ्या नेट, सेट, एम.फिल., कार्यरत प्राध्यापक आदींची संख्या वेगळीच आहे. विद्यापीठात संशोधनासाठी गाईड मिळत नसल्याच्या तक्रारी नव्या नाहीत. मध्यंतरी गाईडची संख्या वाढविण्यासाठी प्राचार्य डॉ. अशोक मोहेकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने काही नियम व अटी शिथिल केल्या होत्या. त्यानुसार आता गाईडची संख्या ५०० वरून वाढून आता ७५९ पर्यंत आली आहे. दुसरीकडे पेट-१, पेट-२ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संशोधनासाठी गाईड मिळाले नसल्यामुळे ते विद्यापीठात खेटे घालत आहेत. आता पेट-३ झाली. यामध्ये ३ हजार ४६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याशिवाय संशोधनास पात्र असलेले नेट, सेट, एम.फिल., कार्यरत प्राध्यापकांना संशोधनाची संधी कधी मिळणार, असा मोठा पेच विद्यापीठासमोर निर्माण झाला आहे. तो सोडविण्यासाठी कुलगुरू डॉ. चोपडे यांनी विद्यापीठाबाहेरील राज्य तसेच देशभरातील विद्यापीठे, मोठमोठे उद्योग व संस्थांमधील तज्ज्ञांना गाईडशिप देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतला आहे; पण अद्याप कोणाकडून तसा होकार मिळालेला नाही. एकीकडे संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांचा रेटा वाढत आहे, तर दुसरीकडे तुलनेने गाईडची संख्या अपुरी पडत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी विद्यापीठाने आरक्षण, कोटा पद्धत अवलंबली असून त्याद्वारेही समाधानकारक उत्तर मिळत नाही. आता नव्याने आणखी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील १५० महाविद्यालयीन प्राध्यापकांनी गाईडसाठी प्रस्ताव सादर केलेले आहेत. ते ‘आरआरसी’पुढे जातील. छाननीमध्ये पात्र ठरल्यास मान्यतेसाठी पुढे ते बोर्ड आॅफ युनिव्हर्सिटी टीचर्स रिसर्च कमिटी (बीयूटीआरसी) ठेवले जाणार आहेत. ‘बीयूटीआरसी’ची मान्यता मिळाल्यानंतर विद्यापीठात ९०९ गाईड विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.