शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘ब्लॅक स्पॉट्स’वर सावध..! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २०९ ठिकाणी मृत्यू दबा धरून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 17:45 IST

प्रादेशिक परिवहन विभाग विशेष अहवाल; खतरनाक ‘ब्लॅक स्पॉट्स’ ठरताहेत मृत्यूचा सापळा, दोन वर्षांत २,८३६ जणांचा रस्ते अपघातात बळी

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील रस्त्यांवर अपघातांचा अक्षरशः ‘काळा नकाशा’ तयार झाला असून, तब्बल २०९ ब्लॅक स्पॉट्स नागरिकांसाठी खतरनाक बनले आहेत. गेल्या दोन वर्षांत झालेल्या भीषण अपघातांमध्ये २ हजार ८३६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. सेव्ह लाइफ फाउंडेशनच्या सर्वेक्षणानुसार ७५ टक्क्यांहून अधिक अपघातांचे मूळ कारण ‘वाहनांचा अतिवेग'' असले, तरी रस्त्यांची सदोष अभियांत्रिकी रचना आणि ब्लॅक स्पॉट्सवरील उपाययोजनांचा अभाव हीदेखील कारणे आहेत.

केवळ दंडात्मक कारवाई करून हे सत्र थांबणार नाही, तर त्यासाठी प्रत्येक वाहनचालकाने वेगावर नियंत्रण ठेवणे आणि ''रोड सेफ्टी ऑडिट''नुसार तातडीने दुरुस्त्या करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विविध राष्ट्रीय महामार्ग तसेच समृद्धी महामार्ग ही प्रमुख ठिकाणे अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. जिल्ह्यातील महामार्गांसह जालना रोड, जळगाव रोडवरील विविध ठिकाणे वाहनचालकांसह पादचाऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहेत. दुसरीकडे, समृद्धी महामार्गावर होणारे अपघात चिंता निर्माण करणारे आहेत. सावंगी इंटरचेंज ते हडस पिंपळगाव या पट्ट्यात वाहनांचा वेग अनियंत्रित असल्याने येथे मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे.

९० ठिकाणी तांत्रिक सुधारणाजिल्ह्यातील २०९ ब्लॅक स्पॉट्सपैकी केवळ ९० ठिकाणी आतापर्यंत तांत्रिक सुधारणा झाल्या आहेत. उर्वरित ठिकाणी अद्यापही मृत्यू दबा धरून बसला आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, एएचएआय, एमएसआरडीसी, आरोग्य विभाग, परिवहन विभाग, पोलिस विभाग, राज्य महामार्ग पोलिस यांच्या उपाययोजनांसह शिक्षण विभागानेही अपघाताच्या संदर्भात जनजागृतीसाठी पाऊल टाकले आहे.

किती अपघात, किती मृत्यू, किती जखमी?२०२४ मध्ये जिल्ह्यात एकूण ६५१ भीषण अपघात झाले होते, ज्यामध्ये १ हजार ३६३ जणांचा मृत्यू झाला, तर ८६२ जण गंभीर जखमी झाले होते. मात्र, २०२५ हे वर्ष अधिकच जीवघेणे ठरले. या एका वर्षात अपघातांची संख्या ७०१ वर पोहोचली असून, मृतांचा आकडा १ हजार ४७३ पर्यंत गेला. तर ९९७ लोक जखमी झाले. यात अनेकजण दिव्यांग झाले.

अपघात कमी करण्यासाठी प्रयत्नशीलजिल्हा रस्ता सुरक्षा समितीमार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सेव्ह लाइफ फाउंडेशन यांच्या अहवालानुसार उपाययोजना करण्यासाठी, अपघात व अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी जिल्ह्यात सर्व विभाग प्रयत्नशील आहेत.- विजय काठोळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी

English
हिंदी सारांश
Web Title : Caution on 'Black Spots'! 209 Death Traps in Sambhajinagar District

Web Summary : Sambhajinagar roads have 209 dangerous 'black spots' where over 2,836 people died in accidents in two years. Speeding, poor road design, and lack of safety measures are key factors. Technical improvements are underway at some spots, but many remain death traps. Authorities are urged to improve safety.
टॅग्स :Accidentअपघातchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर