शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
6
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
7
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
8
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
9
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
10
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
11
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
12
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
13
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
14
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
15
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
16
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
17
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
18
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
19
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
20
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
Daily Top 2Weekly Top 5

दूषित पाण्यापासून सावधान

By admin | Updated: July 28, 2014 01:00 IST

नांदेड : पावसाळ््यात विविध आजार डोके वर काढत असून गंभीर बाब म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या नळातूनच आजार आपल्या घरात प्रवेश करीत आहेत.

नांदेड : पावसाळ््यात विविध आजार डोके वर काढत असून गंभीर बाब म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या नळातूनच आजार आपल्या घरात प्रवेश करीत आहेत. दूषित पाण्यामुळे विविध आजार बळावतात. यासाठी या मोसमात पाणी गाळून आणि उकळून प्यायला हवे. शिवाय या दिवसांत शिळे अन्न खाणे व वारंवार भिजत राहणेही आजाराला निमंत्रण देते.पावसाळ््यात दूषित पाण्यामुळे आजार वाढतात कॉलरा, टायफाईडसारख्या आजारामध्ये भर पडते, म्हणूनच पाणी उकळून आणि गाळून घेण्याच्या सूचना डॉक्टर देत असतात. घराघरातून प्रत्येक गृहिणी या नियमाचे काटेकोरपणे पालन करीत असतात. तरी गढूळ पाणायामुळे अनेकांना आजाराचा सामना करावा लागतो. फक्त पाणी प्यायल्यामुळेच आजारांना तोंड द्यावे लागते. असे अजिबात नाही. तर पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळेही सर्दी, खोकला, ताप, येऊन अनेकांना अंथरुण धरावे लागते. पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्यामुळे स्किन इन्फेक्शन होणे, अ‍ॅलर्जी अशाही समस्या उद्भवतात. इतर ऋतूप्रमाणे पावसाळ््यातही स्वच्छ पाणीपुरवठा होत असला तरी पाणी भरताना, साठवताना आणि पितांना या तीनपैकी कोणत्यातही एका बाबतीत निष्काळजीपणा झाल्याने पाणी दूषित होते. यासाठी पाणी उकळून आणि गाळून प्यावे.डासांपासून सावध रहा पावसाळ््यात बऱ्याच ठिकाणी पाणी साचून राहते. अशा पाण्याच्या डबक्यांमध्ये डासांची अधिक पैदास होते.त्यामुळे या काळात मलेरिया,डेंग्यू, चिकुनगुनिया यासारख्या आजारांचे प्रमाण अधिक प्रमाणात दिसून येते.याशिवाय स्किन इन्फेक्शनच्या समस्यासुद्धा अधिक प्रमाणात वाढतात. दूषित पाण्यामुळे जुलाब, गॅस्ट्रो, व्हायरल इन्फेक्शन, हेपिटायटीस असे आजार उद्भवतात. गर्भवती स्त्रियांमध्ये हेपिटायटीस ई होण्याची शक्यता अधिक असते. सर्दी आणि खोकला हे आजार बऱ्याच प्रमाणात दिसून येतात.महत्त्वाच्या टिप्सज्या भांड्यात आधी पाणी भरले, तेच भांडे न धुऊन घेता पुन्हा त्यात पाणी भरणे किंवा वॉश बेसिन तसेच टॉयलेटजवळ पाणी साठवून ठेवणे, यामुळे पाण्यातून इन्फेक्शन होण्याचे प्रमाण वाढते़ म्हणून आधीच पाणी भरलेल्या भांड्यात पुन्हा पाणी भरु नका़पिण्याचे पाणी माठातून किंवा टाकीतून घेताना थेट ग्लास त्यात बुडवू नका़ खाता-पिताना हात स्वच्छ धुतलेले असतील, याची काळजी घ्या़ बाहेरुन स्वच्छ पाणी आले, तरी सोसायटीच्या टाक्यांमध्ये आजूबाजूला साचलेले पावसाचे खराब पाणी मिक्स होण्याचीही शक्यता असते म्हणूनच सोसायटीच्या टाकीत असे पाणी जाणार नाही, याची काळजी घेणेही महत्त्वाचे असते़आजार आणि लक्षणेटायफाईड, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस, थंडी वाजून ताप येणे, सांधेदुखी, भूक न लागणे, मळमळ होणे, डोकेदुखी़हेपिटायटीस ए आणि ई -डोळे पिवळे होणे, लघवी पिवळी होणे, भूक न लागणे, उलटी झाल्यासारखे वाटणे, बारीक ताप येणे़गॅस्ट्रो, डायरिया : उलटी होणे, जुलाब होणे. अशी घ्या काळजी...बाहेरचे, रस्त्यावरचे अन्नपदार्थ खाऊ नये जेवताना हात स्वच्छ धुऊन घ्यावेत़पाणी गाळून आणि उकळून प्यावे, फळे खाण्यापूर्वी स्वच्छ धुऊन घ्यावेत.भाज्या नीट धुऊन, उकळून घ्या़बाथरुममधून आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुऊन घ्या.