शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
2
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
4
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
5
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
6
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
7
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
8
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
9
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
10
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
11
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
12
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
13
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
14
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
15
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
16
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
17
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
18
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
19
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
20
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...

१००० बिघा जमिनीवर २०० वर्षांपूर्वी वसले ‘बेथेल’; आजही आहे केवळ ख्रिस्ती लोकांचे वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 9:01 AM

ख्रिस्तांचे जन्मगाव ‘बेथलहेम’वरून ठेवले गेले गावाचे नाव

ठळक मुद्दे४०० बिघा जमीन गाव वसवण्यासाठी आणि ६०० बिघा जमीन गावातील लोकांना कसण्यासाठी एकूण १००० बिघा जमीन शेतसारा निझाम सरकारकडे जमा करण्याच्या अटीवर मिळविली जमीन. 

- प्रभुदास पाटोळे 

औरंगाबाद : येशू ख्रिस्तांचा जन्म पॅलेस्टाईन देशातील गालिल प्रांतामधील ‘बेथलहेम’ गावी झाल्याचे मानले जाते. त्यामुळे जगभरात ‘बेथलेहेम’ हे गाव सर्वश्रुत आहे. याच नावाशी साधर्म्य असलेले केवळ ख्रिस्ती लोकांसाठीच तत्कालीन मिशनरींनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी वसवलेले ‘बेथेल’ गाव पूर्वीच्या औरंगाबाद जिल्ह्यात आणि आताच्या जालना जिल्ह्यात आहे. 

विशेष म्हणजे सुमारे दोन हजार लोकवस्ती असलेल्या या गावात आजही कोणीही ख्रिस्तेतर नाही. गावात दोनशे वर्षांपूर्वी बांधलेल्या चर्चशिवाय अन्य कोणत्याही धर्माचे प्रार्थनास्थळ नाही. येथे केवळ ख्रिस्ती सणच साजरे होतात. विशेष म्हणजे निजाम सरकारकडून एक हजार बिघा जमीन मिळवून ‘बेथेल’ गाव वसविणारे जन्मत: ब्राह्मण असलेले मिशनरी डॉ. नारायण गोविंद शेषाद्री हे मूळचे परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचे रहिवासी होते. नारायण यांचे १८३६ च्या सुमारास पुणे येथील स्कॉटिश मिशन शाळेत शिक्षण झाले. १३ सप्टेंबर १८४३ साली त्यांनी विधीवत ख्रिस्ती धर्म स्वीकारून १८५१ सालापासून धर्मोपदेशक म्हणून काम सुरू केले. १८६६ साली त्यांची जालन्याला बदली झाली. त्यांनी अनेकांना ख्रिस्ती धर्माचा बाप्तीस्मा दिला. या नव्याने ख्रिस्ती झालेल्यांसाठी गाव वसविण्याचे डॉ. शेषाद्री यांनी ठरविले. जालन्यापासून पाच-सहा कि.मी. अंतरावर पुरेशी जागा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. 

निजामाच्या दरबारातील ब्रिटिश रेसिडेंट सर रिचर्ड टेंपल मुंबईला आले असताना काही मिशनरींसोबत डॉ. शेषाद्री यांनी त्यांची भेट घेऊन जालन्याजवळील जमीन मिळण्याची विनंती केली. त्यानंतर डॉ. शेषाद्री यांनी हैदराबादला जाऊन निजामाचे दिवाण सालारजंग यांची भेट घेऊन ४०० बिघा जमीन गाव वसवण्यासाठी आणि ६०० बिघा जमीन गावातील लोकांना कसण्यासाठी, अशी एकूण १००० बिघा जमीन शेतसारा सरकारकडे जमा करण्याच्या अटीवर मिळविली. 

डॉ. शेषाद्री यांनी मिशन कमिटीकडून आलेले पैसे आणि स्वत: उभारलेल्या कर्जातून गाव वसविले. तेथे एक भव्य चर्च (सियोन चर्च) बांधले, जे आजही सुस्थितीत आहे. चर्चमध्ये सध्या रेव्ह. एस.एस. खंडागळे कार्यरत आहेत. गावात दोन शाळा सुरू करून त्यांना अनुक्रमे ‘सालारजंग’ आणि नवाब बहादूर’ अशी नावे दिली. शिवाय ग्रामस्थांना आणि तेथून जाणाऱ्यांच्या उपयोगासाठी मोठी विहीर बांधली. त्यातून आजही गावाला पाणीपुरवठा होतो. याच गावात डॉ. शेषाद्री यांची कबर आहे.

मराठवाड्यातील एकमेव गाव‘बेथेल’ हे १०० टक्के ख्रिस्ती लोकांची वस्ती असलेले केवळ जालना जिल्ह्यातीलच नव्हे, तर संपूर्ण मराठवाड्यातील एकमेव गाव आहे. आतापर्यंत आपले वेगळेपण अबाधित ठेवलेले हे गाव जालना शहरापासून पाच ते सात कि.मी. अंतरावर आहे. नवीन शासकीय योजनांमुळे जालना शहराचा विस्तार होत असून, त्याची हद्द बेथेलपर्यंत पोहोचली आहे. यामुळे येथे आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही. गावात केवळ ख्रिस्तीबांधवच असल्यामुळे हे गाव ‘ऐक्य, सेवा आणि साक्ष’ यांचे मूर्तिमंत उदाहरण आहे. येथील मंडळींची पास्टोरेट कमिटी, महिला मंडळ, तरुण संघ धार्मिक कार्यात अग्रेसर असतात. ‘बेथेल’ हा इब्री शब्द आहे. त्याचा अर्थ ‘देवाचे घर’ होतो. हे नाव मंडळीने सार्थ केले असल्याची प्रतिक्रिया उत्तर भारतीय ख्रिस्ती महामंडळाच्या मराठवाडा धर्मप्रांताचे बिशप रा. रेव्ह. एम.यू. कसाब यांनी दिली. 

टॅग्स :ChristmasनाताळAurangabadऔरंगाबादSocialसामाजिकJalanaजालना