उत्तम प्रशासक, जाणकार हवा

By Admin | Updated: May 24, 2014 02:06 IST2014-05-24T01:57:10+5:302014-05-24T02:06:21+5:30

औरंगाबाद : विभागातील सर्वात मोठ्या ज्ञान मंदिराच्या कुलगुरूपदी उत्तम प्रशासक, प्रश्नांची जाण असणारा तसेच विद्यापीठाचा दर्जा अधिक उंचावणारा कुलगुरू असला पाहिजे,

Best Administrator, Savvy Air | उत्तम प्रशासक, जाणकार हवा

उत्तम प्रशासक, जाणकार हवा

औरंगाबाद : विभागातील सर्वात मोठ्या ज्ञान मंदिराच्या कुलगुरूपदी उत्तम प्रशासक, प्रश्नांची जाण असणारा तसेच विद्यापीठाचा दर्जा अधिक उंचावणारा कुलगुरू असला पाहिजे, अशी भूमिका शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली. कुलगुरू भूमिपुत्र असावा, किंवा नाही याविषयी संमिश्र प्रतिक्रिया विविध प्राध्यापक संघटना, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी संघटनांच्या नेत्यांनी व्यक्त केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विद्यापीठाच्या कुलगुरूपदावर कोण बसणार याची उत्सुकता शिक्षण क्षेत्रात आता शिंगेला पोहोचली आहे. २९ आणि ३० मे रोजी मुंबई विद्यापीठात कुलगुरूपदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ८ प्राध्यापकांसह २९ उमेदवार कुलगुरूपदाच्या शर्यतीत आहेत. कुलगुरूपदी कोणाची वर्णी लागते याकडे शिक्षण क्षेत्रासह विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Best Administrator, Savvy Air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.