शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल अ‍ॅप्सचा होतोय फायदा...!

By admin | Updated: August 18, 2016 00:51 IST

जालना : संगणक क्रांतीनंतर मोबाईल क्रांतीमुळे मोठे बदल होताना दिसत आहेत. स्मार्टफोनमुळे अनेक कामे हाताच्या बोटावर होत असल्याने अनेकांना नवल वाटते.

जालना : संगणक क्रांतीनंतर मोबाईल क्रांतीमुळे मोठे बदल होताना दिसत आहेत. स्मार्टफोनमुळे अनेक कामे हाताच्या बोटावर होत असल्याने अनेकांना नवल वाटते. त्यातच बँका, विमा कंपन्या, महावितरण,मोबाईल कंपन्या, स्पर्धा परीक्षांची माहिती या अ‍ॅप्समुळे फायदा होण्यासोबतच कामे सुकर हात असल्याचे लोकमत सर्व्हेक्षणातून समोर आले. बहुतांश स्मार्टफोनधारक मोबाईल बिल, वीज बिल, विमा पॉलिसी अथवा बँकांचे व्यवहार अ‍ॅप्सद्वारे करीत असल्याचे या सर्व्हेक्षणातून समोर आले. व्यवहार तात्काळ होण्यासोबतच वेळेची बचत होते. आपले खात्याची काय स्थिती आहे याची माहिती तात्काळ समोर येते. विशेष म्हणजे आपण पाहिजे त्या ठिकाणाहून ही कामे करता येत असल्याने अनेकांनी मोबाईल अ‍ॅप्सला महत्व दिले. मोबाईल अ‍ॅप्स त्याचा उपयोग व दुरूपयोग यावर स्मार्टफोनधारकांच्या प्रश्नावलीच्या माध्यमातून प्रतिक्रया जाणून घेण्यात आल्या. यात चार प्रश्न विचारण्यात आले. मोबाईल अ‍ॅप्समुळे कामे सुकर झाली का? यावर ४० टक्के नागरिकांना होय असे वाटते. ३० टक्के नागरिकांना नाही असे वाटते तर ३० टक्के नागरिकांना याबबत काहीच माहिती नाही. पण काहीवेळा आम्ही अ‍ॅप्स पाहत असल्याचे अनेकांनी सांगितले. मोबाईल अ‍ॅप्समुळे कामे व्यवस्थित होतात का? यावर ३५ टक्के नागरिक होय म्हणतात. २५ टक्के नाही म्हणतात तर ४० टक्के नागरिक याबाबत अनभिज्ञ आहेत. काहींकडे स्मार्टफोन नसल्याचे अनेकांनी सांगितले.स्पर्धा परीक्षांच्या माहितीसाठी अ‍ॅप्स उपयोगी ठरत आहे का? यावर तरूणांनी प्रतिसाद देत ५० टक्के कौल दिला. ३० टक्के तरूणांना फायदा होत नसल्याचे वाटते. तर २० टक्के लोकांना याबाबत काहीच माहिती नाही. (प्रतिनिधी)