कर्जमाफी योजनेतून शेतकऱ्यांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:15 IST2019-01-28T00:14:06+5:302019-01-28T00:15:07+5:30

जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी आदी योजनेतून जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकºयांना लाभ देण्यात आला. या योजना लाभार्थ्यांसाठी लाभकारी ठरल्या आहेत, असे प्रतिपादन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी प्रजासत्ताक दिनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार सदैव शेतकºयांच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

 Benefits to farmers through debt waiver scheme | कर्जमाफी योजनेतून शेतकऱ्यांना लाभ

कर्जमाफी योजनेतून शेतकऱ्यांना लाभ

ठळक मुद्देदिवाकर रावते : फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकार शेतकºयांच्या पाठीशी



औरंगाबाद : जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी आदी योजनेतून जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकºयांना लाभ देण्यात आला. या योजना लाभार्थ्यांसाठी लाभकारी ठरल्या आहेत, असे प्रतिपादन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी प्रजासत्ताक दिनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार सदैव शेतकºयांच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
येथील पोलीस आयुक्त कार्यालयाच्या देवगिरी मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण रावते यांच्या हस्ते झाले. यावेळी रावते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर, पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त निपुण विनायक, जि. प.च्या सीईओ पवनीत कौर, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह आदींची उपस्थिती होती. रावते म्हणाले, जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने शासनाने दुष्काळ घोषित केला. उपाययोजनांची अंमलबजावणीही तात्काळ करण्यास सुरुवात केली.
जनावरांच्या चाºयासाठी ज्या क्षेत्रात थोडेफार पाणी उपलब्ध आहे, त्याठिकाणी शासनामार्फत शेतकºयांना मोफत बियाणे, पाणी उपलब्ध करून देण्यात आले. गाळपेºयासाठी आकारणी करीत असलेले शुल्कदेखील चारा पिकांसाठी माफ केले. यामध्ये २१ हजारांपेक्षा अधिक शेतकºयांनी प्रतिसाद दिला असून, अडीच लाख मेट्रिक टन चाºयाची निर्मिती होणे अपेक्षित आहे.
रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामांवर आजपर्यंत ५२ कोटी रुपये खर्च झाले आहेत. ५८ हजार ९०० मजुरांना रोजगार उपलब्ध झाला. जलयुक्त शिवार अभियानात ३०४ गावांमध्ये १ हजार ४०६ कामे सुरू आहेत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत औरंगाबादमधील पहिल्या टप्प्यात ७७ आणि दुसºया टप्प्यात १९४ गावांमध्ये कामे सुरू आहेत.
जिल्ह्यात ९८६ कोटी २८ लाखांची कर्जमाफी
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यात ९८६ कोटी २८ लाख रुपयांची कर्जमाफी करण्यात आली आहे. नागपूर-मुंबई द्रुतगती महामार्ग म्हणजेच समृद्धी महामार्गासाठी ज्या शेतकºयांनी सहकार्य करून आपली शेती दिली त्यांनासुद्धा बाजारभावापेक्षा पाचपट रक्कम देऊन समृद्धी महामार्गाने समृद्ध करण्याचे काम केले आहे. समृद्धीसाठी जमीन देणाºया शेतकºयांना सुमारे १ हजार ३०० कोटी रुपयांच्या मोबदल्यांचे वाटप करण्यात आल्याचे रावते म्हणाले.
-------------

Web Title:  Benefits to farmers through debt waiver scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.