शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

अजिंठा लेणीत मधाचे पोळे काढल्यानंतरही उपद्रव; आग्या मोहळाचा पुन्हा २५ पर्यटकांवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 12:54 IST

मार्च व जून महिन्यांत पर्यटकांवर तीन ते चार वेळा आग्या मोहोळाच्या माश्यांनी हल्ला चढविला होता. यामध्ये मोठ्या संख्येने पर्यटक जखमी झाले होते.

फर्दापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या आग्या मोहळाच्या पोळ्यांचे स्थलांतरण केल्यानंतर रविवारी (दि. २९) पुन्हा २५ पर्यटकांवर या माश्यांनी हल्ला केला. या जखमी पर्यटकांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागल्याने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

मार्च व जून महिन्यांत पर्यटकांवर तीन ते चार वेळा आग्या मोहोळाच्या माश्यांनी हल्ला चढविला होता. यामध्ये मोठ्या संख्येने पर्यटक जखमी झाले होते. त्यानंतर पुरातत्त्व व वन विभागाने कार्यवाही करून १० जून रोजी लेणी क्र. दहा व इतर ठिकाणी असलेले संपूर्ण पोळे हटविले होते. काही ठिकाणी मधमाश्यांचे छोटे पोळे अजूनही शिल्लक असल्याचे रविवारी पुन्हा दिसून आले. रविवारी दुपारी साडेतीन वाजता लेणी क्र. २५ जवळ या माश्या पुन्हा अवतरल्या व त्यांनी २५ पर्यटकांवर हल्ला केला. यामुळे पर्यटकांची चांगलीच धावपळ झाली.

बाजूच्या बंद पडलेल्या बागेतील झाडावरील आग्या मोहळाने हा हल्ला केलेला असावा. लेणी क्र. २५ जवळ छोटे पोळे आहे, तेही काढले जाईल.- मनोज पवार, संवर्धन सहायक, पुरातत्त्व विभाग, अजिंठा लेणी

संपूर्ण लेणीच जंगलात असल्याने येथे मधमाश्यांचा अधिवास पूर्वाश्रमीचा आहे. पर्यटकांसाठी धोकादायक ठरलेली पोळे पूर्णत: काढली आहेत, तरीही आज या माश्या परतल्याने त्याकडे लक्ष केंद्रीत केले जाईल. परिसरात अजून कोठे-कोठे पोळे आहेत, याचीही पाहणी करून त्यांचेही स्थलांतरण केले जाईल.- संतोष दोडके, वनपरिक्षेत्र अधिकारी, अजिंठा

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर