ब्युटी पार्लर कार्यशाळेस भरघोस प्रतिसाद

By Admin | Updated: May 25, 2014 01:11 IST2014-05-25T00:41:00+5:302014-05-25T01:11:44+5:30

लातूर : लोकमत सखी मंच आणि राधिका ब्युटी पार्लर यांच्या संयुक्त विद्यमाने सखी मंच सदस्यांसाठी शनिवारी ‘लोकमत भवन’मध्ये घेण्यात आलेल्या ब्युटी पार्लर कार्यशाळेस भरघोस प्रतिसाद मिळाला.

A beauty parlor workshop has a rich response | ब्युटी पार्लर कार्यशाळेस भरघोस प्रतिसाद

ब्युटी पार्लर कार्यशाळेस भरघोस प्रतिसाद

 लातूर : लोकमत सखी मंच आणि राधिका ब्युटी पार्लर यांच्या संयुक्त विद्यमाने सखी मंच सदस्यांसाठी शनिवारी ‘लोकमत भवन’मध्ये घेण्यात आलेल्या ब्युटी पार्लर कार्यशाळेस भरघोस प्रतिसाद मिळाला. लोकमत सखी मंचच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘ब्युटी पार्लर’ या विषयावरील कार्यशाळेत हाता-पायांची स्वच्छता, घरच्या घरी फेशियल करणे, केसांची काळजी घेणे, पिंपल्स नाहीसे करणे आदी विषयांवर वंदना बांगड यांनी उपस्थित सखी मंच सदस्यांना सखोल मार्गदर्शन केले. सखी मंचच्या वतीने घेण्यात आलेल्या या कार्यशाळेस भरघोस प्रतिसाद मिळाला. लोकमत सखी मंचच्या वतीने महिलांच्या सुप्तगुणांना वाव मिळावा म्हणून ‘लोकमत’तर्फे विविध कार्यक्रम घेतले जातात. त्याच धर्तीवर ‘लोकमत सखी मंच’ आणि राधिका ब्युटी पार्लर यांच्या संयुक्त विद्यमाने ब्युटी पार्लर या विषयावरील कार्यशाळा घेऊन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेची निगा कशी राखावी, त्वचेची कशी काळजी घ्यावी, यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओंकार धर्माधिकारी यांनी केले. यावेळी लोकमत सखी मंचच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)

Web Title: A beauty parlor workshop has a rich response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.