किरकोळ कारणावरून मारहाण
By Admin | Updated: November 16, 2015 00:37 IST2015-11-15T23:54:46+5:302015-11-16T00:37:28+5:30
शिराढोण : किरकोळ कारणावरून एकास शिवीगाळ करीत जबर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघाविरूध्द शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

किरकोळ कारणावरून मारहाण
शिराढोण : किरकोळ कारणावरून एकास शिवीगाळ करीत जबर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघाविरूध्द शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास देवळाली (ताक़ळंब) येथे घडली़ याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कळंब तालुक्यातील देवळाली येथील ज्ञानोबा शेळके यांच्या घरासमोर लावलेल्या दुचाकीवरून शशिकांत हणुमंत डुकरे, हणुमंत सिताराम डुकरे, छायाबाई डुकरे यांच्यामध्ये बाचाबाची झाली़ त्यावेळी वरील तिघांनी शिवीगाळ मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद ज्ञानोबा शेळके यांनी शिराढोण पोलीस ठाण्यात दिली़ शेळके यांच्या फिर्यादीवरून वरील तिघाविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ तपास पोना बाबासाहेब मोराळे हे करीत आहेत़ (वार्ताहर)