शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

बीडमध्ये गोदाम देता का, गोदाम..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:23 AM

जिल्ह्यात नाफेडच्या केंद्रांवर तूर खरेदीची गती मंदावलेली असताना आतापर्यंत खरेदी केलेल्या तुरीपैकी ५० हजार क्विंटल तूर अद्याप गोदामात गेलेली नाही. परिणामी आतापर्यंत केवळ २ हजार ५०० शेतक-यांनाच तुरीचे पेमेंट झाले आहेत. खरेदी केलेल्या तूरीसाठी गोदाम शोधण्याची वेळ यंत्रणेवर आली आहे.

ठळक मुद्दे५० हजार क्विंटल तुरीला हवे संरक्षण : गोदामात माल न गेल्याने शेतकऱ्यांचे पेमेंट रखडणार

अनिल भंडारी 

बीड : जिल्ह्यात नाफेडच्या केंद्रांवर तूर खरेदीची गती मंदावलेली असताना आतापर्यंत खरेदी केलेल्या तुरीपैकी ५० हजार क्विंटल तूर अद्याप गोदामात गेलेली नाही. परिणामी आतापर्यंत केवळ २ हजार ५०० शेतक-यांनाच तुरीचे पेमेंट झाले आहेत. खरेदी केलेल्या तूरीसाठी गोदाम शोधण्याची वेळ यंत्रणेवर आली आहे.

बीड जिल्ह्यातील १४ केंद्रांवर ४० दिवसात ७० हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. वास्तविक पाहता या कालावधीत खरेदीचे प्रमाण किमान दुप्पट अपेक्षित होते. परंतु, वखार महामंडळाकडून गोदाम उपलब्ध न झाल्याने खरेदी प्रक्रिया संथपणे होत आहे. आतापर्यंत केवळ २३ हजार क्विंटल तूर शासकीय गोदामात पाठविण्यात आलेली आहे. तर ५० हजार क्विंटल तूर सांभाळण्याची वेळ मार्केटिंग फेडरेशनवर आली आहे. नाफेडच्या केंद्रावर तूर खरेदी केल्यानंतर ती रितसर गोदामात पाठविली जाते. त्यानंतर मिळणा-या पावत्यांनुसार संबंधित तूर विकलेल्या शेतकºयांच्या पेमेंटची प्रक्रिया होते. परंतु, ५० हजार क्विंटल तूर अद्याप गोदामात न गेल्यामुळे ही तूर विकलेल्या शेतक-यांच्या पेमेंटलाही विलंब होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

जिल्ह्यातील नाफेडच्या १४ पैकी ५ केंद्रांवर खरेदी केलेल्या तुरीचे शेतकºयांना पेमेंट प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. माजलगाव तालुक्यातील ३६१, आष्टीतील १८६, गेवराईत १६१, कड्यात २०१ तसेच शिरुर कासार येथील १७५ अशा एकूण ११०४ शेतकºयांना आतापर्यंत तुरीचे पेमेंट मिळाले आहे. खरेदी केंद्रावरील तूर वखारच्या गोदामात डिपॉझिट झाल्याशिवाय पेमेंट मिळत नसल्याने गोदाम उपलब्ध होणे गरजेचे असून, त्यादृष्टीने यंत्रणेने गती घेण्याची गरज आहे.

नवीन समस्या उद्भवण्याआधीच उपाययोजना गरजेचीखरेदी केलेली तूर गोदामात सुरक्षित झाल्यानंतर पावत्या मिळतात. त्यानंतर शेतकºयांचे पेमेंट वाटप करण्यात येते. मात्र तोपर्यंत तूर सांभाळण्याची जबाबदारी मार्केटिंग फेडरेशनवर असते.सध्या ताडपत्री टाकून खरेदी केलेली तूर सुरक्षित असली तरी वातावरणातील बदलामुळे आर्द्रतेचे प्रमाण वाढू शकते.त्यामुळे नाफेडकडून निकषांवर बोट ठेवून तूर अपात्र ठरविली जाऊ शकते. नवीन समस्या निर्माण होण्याआधी ही बाब शासन यंत्रणेने लक्षात घेणे महत्वाचे आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीBeedबीडMarket Yardमार्केट यार्डagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र