सावधान ! बनावट कस्टमर केअरचा ६३ हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 16:05 IST2020-12-16T16:04:39+5:302020-12-16T16:05:36+5:30
तक्रारदार तरुणीचे गुगलपेवर व्यवहार करताना जास्तीचे पैसे कपात होत होते.

सावधान ! बनावट कस्टमर केअरचा ६३ हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा
औरंगाबाद : गुगलपेवर जास्तीचे पैसे कपात होत असल्यामुळे गुगलवर कस्टमर केअरशी संपर्क साधणे तरुणीला चांगलेच महागात पडले. सायबर गुन्हेगाराने त्यांना क्यू ए ॲप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगून तरुणी आणि तिच्या मित्राच्या खात्यातून ६२ हजार ७३८ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली.
तक्रारदार तरुणीचे गुगलपेवर व्यवहार करताना जास्तीचे पैसे कपात होत होते. तिने गुगलवर गुगल पेच्या कस्टमर केअरचा नंबर मिळवून संपर्क केला. सायबर गुन्हेगाराने त्यांना क्यू ए ॲप्लिकेशन मोबाइलमध्ये डाऊनलोड करायला सांगितले. तक्रारदार तरुणीने ॲप्लिकेशन डाऊनलोड करताच आरोपीने तरुणी आणि तिच्या मित्राला व्यवहार करायला लावला. यादरम्यान त्यांच्या खात्यातून ६२ हजार ७३८ रुपये काढले. त्यांनी हर्सूल ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक सचिन इंगोले तपास करीत आहेत.