परीक्षेपूर्वीच 'डायरेक्ट टॅक्स'चा पेपर 'थेट' मोबाईलवर; छ. संभाजीनगरातील धक्कादायक प्रकार

By संतोष हिरेमठ | Updated: April 11, 2026 19:13 IST2026-04-11T19:11:35+5:302026-04-11T19:13:04+5:30

बी.कॉमचा पेपर परीक्षेपूर्वीच व्हायरल; क्युआर कोडने पैसे दिले अन् प्रश्नपत्रिका आली

B.Com Paper Leak: Direct Tax Exam Question Paper Viral on WhatsApp in Chhatrapati Sambhajinagar. | परीक्षेपूर्वीच 'डायरेक्ट टॅक्स'चा पेपर 'थेट' मोबाईलवर; छ. संभाजीनगरातील धक्कादायक प्रकार

परीक्षेपूर्वीच 'डायरेक्ट टॅक्स'चा पेपर 'थेट' मोबाईलवर; छ. संभाजीनगरातील धक्कादायक प्रकार

छत्रपती संभाजीनगर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा गलथान कारभार शनिवारी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. बी.कॉम तृतीय वर्षाच्या 'डायरेक्ट टॅक्सेस' या विषयाची प्रश्नपत्रिका दुपारी २ वाजता परीक्षा सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर व्हाट्सॲपद्वारे व्हायरल झाली. खोकडपुरा परिसरातील एका परीक्षा केंद्राबाहेर हा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी १० विद्यार्थ्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

या पेपरफुटीचा धक्कादायक पॅटर्न समोर आला आहे. परीक्षेपूर्वी केंद्राबाहेर विद्यार्थ्यांमध्ये १४० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत प्रश्नपत्रिकेचा सौदा होत असल्याची चर्चा होती. विशेष म्हणजे, पैसे स्वीकारण्यासाठी 'क्युआर कोड'चा वापर केला जात होता. पैसे मिळताच संबंधित विद्यार्थ्याला प्रश्नपत्रिकेचे फोटो पाठवले जात होते. एका कॉलेजच्या संस्थाचालकाच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ विद्यापीठ प्रशासनाला याची माहिती दिली. परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. बी.एन. डोळे यांनी स्वतः केंद्रावर जाऊन पाहणी केल्याची माहिती आहे.

दोषींवर कडक कारवाई होणार
"हा प्रकार अत्यंत गंभीर असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष समिती नेमली जात आहे. प्रश्नपत्रिका नेमकी कुठून आणि कोणत्या स्तरावरून लीक झाली, याचा शोध घेतला जाईल. मोबाईलमधील चॅट्स आणि व्यवहारांची तपासणी करून दोषी आढळणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल," असे डॉ. बी.एन. डोळे यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title : छत्रपति संभाजीनगर में परीक्षा से पहले ही 'डायरेक्ट टैक्स' का पेपर लीक

Web Summary : छत्रपति संभाजीनगर में बी.कॉम का 'डायरेक्ट टैक्स' का पेपर परीक्षा से पहले लीक हो गया। छात्र व्हाट्सएप के माध्यम से इसे ₹140-₹500 में बेच रहे थे, क्यूआर कोड का उपयोग कर रहे थे। दस मोबाइल जब्त, जांच जारी।

Web Title : Direct Tax Paper Leaked Before Exam in Chhatrapati Sambhajinagar

Web Summary : B.Com's 'Direct Taxes' paper leaked in Chhatrapati Sambhajinagar before the exam. Students were trading it via WhatsApp for ₹140-₹500, using QR codes. Ten mobiles were seized, and an investigation is underway to find those responsible.