शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Rohit Pawar : "भ्रष्टाचार करू नका, आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा
3
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
4
खळबळजनक! आई-वडिलांनीच दिली मुलाच्या हत्येसाठी ५,००,००० रुपयांची सुपारी
5
Jewellery Stocks Fall: पंतप्रधानांचं आवाहन आणि टायटन, सेनको, कल्याण यांना बसला फटका; लग्नसराईच्या हंगामात गोल्ड शेअर्स आपटले
6
मनालीची सफर ठरली अखेरची! चंबा-नूरपूर हायवेवर भीषण दुर्घटना; ६ जणांचा मृत्यू, ४ गंभीर
7
शिंदेसेनेच्या संघटनबांधणीसाठी श्रीकांत शिंदे राज्यव्यापी दौरा करणार, दोन महिन्यांत २२ जिल्हे पिंजून काढणार 
8
‘वाह मोदीजी वाह! अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले आज पेट्रोल, डिझेल वापरू नका म्हणून सांगताहेत’  विजय वडेट्टीवार यांचा टोला
9
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
10
थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णन गर्दीत अडकली; अभिनेत्रीच्या संयमाचं होतंय कौतुक
11
Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?
12
कल्याण रेल्वे स्थानक की रेडलाइट एरिया ? मध्यरात्री तीन वाजेपर्यंत बेकायदा धंदे, पोलिसांचे नियंत्रण नाही
13
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
14
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
15
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
16
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
17
केवळ पगारवाढीवर अवलंबून आहात का?; 'ही' ३ कारणे आहेत तुम्ही श्रीमंत होण्यातील अडथळा!
18
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
19
Post Office मध्ये ३६ महिन्यांच्या एफडीमध्ये ₹२,००,००० जमा कराल तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
20
Adhik Maas 2026: अधिक मासात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मोंढ्यातील बॅटको ट्रान्सपोर्टला भीषण आग

By admin | Updated: May 21, 2014 01:13 IST

औरंगाबाद : जुना मोंढा परिसरातील जाफरगेट शेजारच्या बॅटको ट्रान्सपोर्टच्या गोदामात मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक आग लागून केमिकलच्या ड्रमचे स्फोट झाले.

 औरंगाबाद : जुना मोंढा परिसरातील जाफरगेट शेजारच्या बॅटको ट्रान्सपोर्टच्या गोदामात मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक आग लागून केमिकलच्या ड्रमचे स्फोट झाले. विशेष म्हणजे या गोदामाशेजारीच पेट्रोलपंप आहे. गोदामाला आग लागण्यापूर्वी अर्धा तास अगोदरच या पंपाच्या भूमिगत टाकीमध्ये १२ हजार लिटर पेट्रोलचे टँकर रिकामे करण्यात आले होते. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. गोदामाच्या शेजारील दोन दुकानालाही आग लागली. या घटनेत २० लाख रुपयांचा माल जळून खाक झाला. जाफरगेटशेजारी असलेल्या बॅटको ट्रान्सपोर्टमध्ये मुंबई येथून केमिकलचे ड्रम पाठविण्यात आले होते. गोदामातील एका ड्रमला गळती होऊन केमिकल बाहेर आले होते. उन्हामुळे दुपारच्या वेळी ड्रमबाहेर वाहणार्‍या केमिकलला अचानक आग लागली व भडका उडाला. या भडक्याने अन्य ड्रमने पेट घेतला. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या ड्रमचे स्फोट होऊ लागले. परिसरातील नागरिक व व्यापार्‍यांनी आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न केले; पण आग धुमसत राहिली. हवेत धूर व आगीचे लोळ पसरले. या ट्रान्सपोर्टशेजारी असलेल्या जहीर यांचे वर्कशॉप व अजीज शेख यांच्या ड्रमच्या दुकानालाही आगीने वेढले. ट्रान्सपोर्टला लागलेली आग आटोक्यात येण्याचे नाव घेत नव्हती. त्यावेळी ट्रान्सपोर्टचे कर्मचारी तसेच नागरिकांनी जिवाची पर्वा न करता गोदामातील साहित्य हलविण्याचे प्रयत्न केले. परिसरातील व्यापार्‍यांनी अग्निशामक दलाला आगीच्या घटनेची माहिती दिली; पण तब्बल अर्ध्या तासानंतर अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. अग्निशामक दलाचे प्रमुख शिवाजी झनझन यांच्या पथकातील २० कर्मचारी, ४ बंब व ६ टँकरने दीड तासात आग आटोक्यात आणली. या घटनेत २० लाख रुपयांचा माल जळून खाक झाला. बॅटको ट्रान्सपोर्टच्या गोदामाशेजारीच पेट्रोलपंप आहे. गेल्या वर्षी याच पंपाला मोठी आग लागली होती. आज दुपारी ३.१० मिनिटांनी १२ हजार लिटर पेट्रोल घेऊन एक टँकर आले. टँकरने पंपाच्या भूमिगत टाकीमध्ये पेट्रोल खाली केले व ते निघताच गोदामात आग भडकली. पेट्रोल रिकामे करतेवेळी जर आग लागली असती, तर मोठी दुर्घटना घडली असती. सुदैवाने आज मोठा अनर्थ टळला. अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून पंपाच्या दिशेने आग पसरू नये, यासाठी खबरदारी घेतली. मागच्या वर्षी जाफरगेट शेजारच्या पेट्रोल पंपाला आग लागली होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी फोमच्या साहाय्याने ५ तास अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली होती. तेव्हा पंपाच्या टाकीने जर आग पकडली असती, तर जवळचा परिसर आगीच्या विळख्यात सापडला असता. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी शहरात नागरी वसाहतीमध्ये असलेले ५ पेट्रोलपंप धोकादायक ठरविले होते. त्यात जाफरगेट शेजारच्या पंपाचा समावेश होता. धोकादायक पंप हटविण्याची मोहीम आयुक्तांनी हाती घेतली होती; परंतु आजही धोकादायक पंप हटलेले नाहीत.