‘बार्टी’ने केले अर्थसाहाय्याचे निकष शिथिल
By | Updated: December 4, 2020 04:09 IST2020-12-04T04:09:29+5:302020-12-04T04:09:29+5:30
औरंगाबाद : संघ लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्वपरीक्षा (यूपीएससी) उत्तीर्ण अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...

‘बार्टी’ने केले अर्थसाहाय्याचे निकष शिथिल
औरंगाबाद : संघ लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्वपरीक्षा (यूपीएससी) उत्तीर्ण अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने एकरकमी ५० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य केले जाते. त्यासाठी पूर्वी ‘बार्टी’ने काही जाचक निकष लावले होते, त्यास स्पर्धा परीक्षेचे अभ्यासक प्रशांत साठे यांच्यासह अनेकांनी आक्षेप घेतले होते. अखेर समाज कल्याणमंत्री धनंजय मुंडे यांनी ते जाचक निकष शिथिल करून पात्र उमेदवारांकडून १५ डिसेंबरपर्यंत अर्ज मागविले आहेत. यामुळे संबंधित उमेदवारांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.