सुखना धरण परिसरात आले परदेशी पाहुणे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 16:35 IST2018-11-12T16:09:22+5:302018-11-12T16:35:33+5:30
कल्पाच्या परिसरात परदेशी पक्ष्यांसह भारतातील विविध पक्षी मुक्कामी आढळून आले आहेत.

सुखना धरण परिसरात आले परदेशी पाहुणे...
औरंगाबाद : शहरापासून २२ कि.मी. अंतरावरील सुखना मध्यम प्रकल्पात परदेशी पाहुण्यांचे आगमन झाले आहे. प्रकल्पाच्या परिसरात परदेशी पक्ष्यांसह भारतातील विविध पक्षी मुक्कामी आढळून आले आहेत.
निसर्ग मित्रमंडळ व महाराष्ट्र पक्षी मित्र संघटना यांच्या वतीने आयोजित संपूर्ण महाराष्ट्रातील पक्षी उत्सव कार्यक्रमांतर्गत स्थानिक, तसेच प्रवासी पक्ष्यांच्या नोंदी घेण्यात आल्या. सुखना जलाशयात शुक्रवारी आयोजित केलेल्या पक्षी निरीक्षणात पक्षी मित्र किशोर गठडी, केदार चौधरी, नागेश देशपांडे, मोहन शिखरे आदी सहभागी झाले होते. सुखना प्रकल्पात दरवर्षी निसर्ग मित्रमंडळातर्फे पक्ष्यांच्या नोंदी घेतल्या जातात. यावर्षी बार हेडेड, फ्लेमिंगो चक्रवाक, ब्लॅक स्टोर्क यांचे आगमन झाले आहे. यावर्षी प्रथमच काही प्रवासी पक्षी लवकर आल्याचे आढळून आले, तर काही पक्षी प्रथमच काही वर्षांच्या अंतराने आल्याचे पक्षी मित्रांनी सांगितले.
या पक्ष्यांचा संचार
सुखना मध्यम प्रकल्पात रोहित (अग्निपंख), चक्रवाक, चमचा (दर्विमुख), काळा करकोचा, पट्टकादंब (पट्टेरी राजहंस), राखी बदक, तलवार बदक, वेडा राघू, कुरव पक्षी, पांढऱ्या छातीची पाणकोंबडी, खंड्या, काष्ठ खाटिक, कोतवाल, नदीसुरय, राखी बगळा, कापशी घार, गप्पीदास, ठिपक्यांचा होला, शेकाट्या, पिवळा धोबी, उघड्या चोचीचा करकोचा, रंगीत करकोचा, मोठ्या वटवट्या या पक्ष्यांच्या नोंदी घेण्यात आल्या.
१. रंगीत करकोचा
२. काळा करकोचा
३. करकोचा
४.कोतवाल
५. वेडा राघू
६. कपाशी घार
७ . फ्लेमिंगो :