धक्कादायक ! औरंगाबादमध्ये बँक अधिका-याची राहत्या घरात गळा चिरुन निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 10:42 IST2017-09-09T10:38:52+5:302017-09-09T10:42:04+5:30

औरंगाबादमधील छत्रपती नगरमध्ये एका बँक अधिकाऱ्याच्या झालेल्या हत्येने खळबळ उडाली आहे.  शेकटा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक जितेंद्र नारायण होळकर यांची राहत्या घरात गळा चिरुन निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

Bank official found dead,In Aurangabad | धक्कादायक ! औरंगाबादमध्ये बँक अधिका-याची राहत्या घरात गळा चिरुन निर्घृण हत्या

धक्कादायक ! औरंगाबादमध्ये बँक अधिका-याची राहत्या घरात गळा चिरुन निर्घृण हत्या

औरंगाबाद, दि. 9 - औरंगाबादमधील छत्रपती नगरमध्ये एका बँक अधिकाऱ्याच्या झालेल्या हत्येने खळबळ उडाली आहे.  शेकटा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक जितेंद्र नारायण होळकर यांची राहत्या घरात गळा चिरुन निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री उशीरा 2.30 वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यांची हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात आली आहे, याची माहिती अद्यापपर्यंत अस्पष्ट आहे.  

47 वर्षीय जितेंद्र होळकर हे आपला 15 वर्षीय मुलगा आणि पत्नीसह राहत होते. हत्या झाली तेव्हा त्यावेळी जितेंद्र होळकर घरातील एका खोलीत तर पत्नी व मुलगा दुसऱ्या खोलीत झोपलेले होते. होळकर यांच्या खोलीतून आवाज आल्यानंतर त्यांच्या पत्नीला हत्या झाल्याचे समजले. ही बाब त्यांनी फोन करुन शेजा-यांना सांगितली. शेजा-यांनी तातडीनं पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना होळकर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. मारेकऱ्यांनी होळकर यांचा आधी दोरीने गळा आवळून नंतर गळा चिरला, असे पोलीस निरीक्षक भारत काकडे यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. 

Web Title: Bank official found dead,In Aurangabad