शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

बँक अधिकाऱ्यांना बनावट नोटांची धास्ती; करावी लागते स्वतःच्या खिशातून भरपाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 14:19 IST

राष्ट्रीयीकृत बँका असो वा खाजगी बँक, तसेच पतसंस्था येथील कॅशियर व अन्य अधिकाऱ्यांना नोटा हाताळताना सदैव सावध राहावे लागत आहे.

ठळक मुद्दे१०० रुपयांची रंगीत झेरॉक्स, तर ५००, २ हजारांची बनावट नोट चलनातबनावट नोटा शोधणाऱ्या उपकरणातून एक नोट दोनदा तपासून खात्री करून मगच जमा करून घ्यावी लागत आहे.

औरंगाबाद : बँकेत दररोज बनावट नोटा येत आहेत. मात्र, कॅशिअरची दक्षता व अद्ययावत उपकरणामुळे बंडलमध्ये येणारी बनावट नोट लगेच शोधली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात आजघडीला सुमारे ५० कोटी रुपये किमतीच्या बनावट नोटा व्यवहारात फिरत आहेत. या नोटा फिरून शेवटी बँकेत जमा होण्यासाठी येतात. नजरचुकीने एखादी नोट जमा झाली तर तेवढी रक्कम अधिकाऱ्यांना स्वत:च्या पगारातून द्यावी लागते. यामुळे बनावट नोटांविषयी बँक अधिकाऱ्यांमध्ये कमालीची धास्ती आहे.  

राष्ट्रीयीकृत बँका असो वा खाजगी बँक, तसेच पतसंस्था येथील कॅशियर व अन्य अधिकाऱ्यांना नोटा हाताळताना सदैव सावध राहावे लागत आहे. विशेषत: १००, ५०० व २ हजार रुपयांचे बंडल जेव्हा येते तेव्हा त्याची तीन ते चार वेळेस तपासणी करावी लागत आहे. बनावट नोटा शोधणाऱ्या उपकरणातून एक नोट दोनदा तपासून खात्री करून मगच जमा करून घ्यावी लागत आहे. बँकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले की, बँकेच्या एका शाखेत महिन्यातून २० ते ३० बनावट नोटा येतात. मात्र, ग्राहकांना सांगून त्या नष्ट केल्या जातात किंवा पोलिसांत तक्रार दिली जाते. बँका शक्यतो ग्राहकांचा राग ओढवून घेत नाही; पण एका व्यक्तीकडे ४ पेक्षा अधिक बनावट नोटा निघाल्या तर याची तक्रार पोलिसांत देण्यात येते. करन्सीचेस्टमधील व्यवस्थापकाने सांगितले की, पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बाजारात आजघडीला चलनात असलेल्या ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या नोटा बनावट आहेत. 

ज्या बनावट नोटा येतात त्यात १०० रुपयांची नोटही रंगीत झेरॉक्स काढलेली असते, तर ५०० व २ हजार रुपयांची हुबेहूब बनावट नोट असते. पेट्रोलपंपावर गर्दीत नागरिक या नोटा चालविण्याचा प्रयत्न करतात. नजरचुकीने एखाद्याकडून बनावट नोट आली व ती बँकेने स्वीकारली नाही, तर पेट्रोलपंपचा मालक त्या संबंधित कर्मचाऱ्याच्या पगारातून तेवढी रक्कम वजा करतो. यामुळे पेट्रोलपंपावरही कर्मचारी आता सावध झाले आहेत. दररोज हाताळून त्यांनाही असली व नकली नोटा सहज कळत आहेत. 

नवीन नोटांची हुबेहूब नक्कलफाटक्या नोटा खरेदी करणाऱ्यांनी सांगितले की, नोटाबंदीआधी जुन्या ५०० व १ हजार रुपयांच्या बनावट नोटा मोठ्या प्रमाणात चलनात होत्या. ही समांतर अर्थव्यवस्था मोडीत काढण्यासाठी या मोठ्या रकमेच्या जुन्या नोटांवर बंदी आणली. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने ५०० व २ हजार रुपयांच्या नवीन नोटा बाजारात आणल्या; पण या नोटांचीही हुबेहूब नक्कल करून त्या व्यवहारात आणल्या जात आहेत. ४पोलीस बनावट नोटा तयार करणाऱ्यांना शोधून त्यांना अटक करीत आहेत.  ग्राहक फाटक्या नोटांमध्येही बनावट नोटा आणून देतात; पण आम्ही त्या नोटा लगेच ओळखतो व पोलिसांत देण्याची धमकी देतो. त्यामुळे बनावट नोट खपविणारे निघून जातात. 

टॅग्स :MONEYपैसाbankबँकfraudधोकेबाजीAurangabadऔरंगाबाद