बालभारतीची लॅमिनेटेड पुस्तके

By Admin | Updated: May 24, 2014 02:08 IST2014-05-24T01:47:03+5:302014-05-24T02:08:47+5:30

माधवी वाकोडकर, औरंगाबाद शाळा सुरू व्हायला सरासरी तीन आठवडे शिल्लक असतानाच पहिली ते दहावीची बहुतांश पाठ्यपुस्तके बाजारात उपलब्ध झाली आहेत.

Balbharti's Laminated Books | बालभारतीची लॅमिनेटेड पुस्तके

बालभारतीची लॅमिनेटेड पुस्तके

माधवी वाकोडकर, औरंगाबाद शाळा सुरू व्हायला सरासरी तीन आठवडे शिल्लक असतानाच पहिली ते दहावीची बहुतांश पाठ्यपुस्तके बाजारात उपलब्ध झाली आहेत. यंदा प्रथमच पहिली ते चौथीपर्यंतची पुस्तके लॅमिनेशनसह आहेत. पहिली ते पाचवीच्या चिमुकल्यांना भडक रंगाचे, चित्रांचे खूप आकर्षण असते. कार्टूनच्या जगात वाढणारी ही लहान मुले पाठ्यपुस्तकांपासून दूर राहणार नाहीत, अशी काळजी पुस्तकांत कार्टून चित्र देऊन घेण्यात आली आहे. ही पुस्तके वारंवार हाताळली तरी ती खूप दिवस टिकावीत यासाठी त्यांना लॅमिनेशनही करण्यात आले आहे. या लॅमिनेटेड पुस्तकांचे आयुष्य वाढले असून, त्यांची पाने सहज वेगळी होणार नाहीत. तसेच पुस्तकांचे मुखपृष्ठ आकर्षक केल्यामुळे विद्यार्थ्यांची पुस्तकांबद्दल उत्सुकता टिकून राहील. मुलांना अभ्यासाची गोडी कायम राहील. पुस्तकांना लॅमिमेशन करण्यात आल्याने ही पुस्तके पहिल्या पुस्तकांपेक्षा जास्त आकर्षक बनली आहेत. त्यातील कागदाचा दर्जा उत्तम असल्यामुळे ही पुस्तके दीर्घकाळ टिकतील. ही पुस्तके आकर्षक असल्यामुळे कार्टून बघणारी मुले पुस्तकातही मन रमवतील व त्यांना पुस्तकांबद्दल प्रेम वाटेल, अशी आशा आहे. -चंद्रमणी बोरकर, संचालक, पाठ्यपुस्तक मंडळ पुणे ही पुस्तके लॅमिनेटेड असल्यामुळे त्यांचा दर्जा उंचावला आहे. पुस्तकांचा कागद चांगल्या दर्जाचा आहे. त्यामुळे चित्रे अधिक आकर्षक व बोलकी झाली आहेत. या चित्रांमुळे शिक्षकांना धडा शिकवण्यास व विद्यार्थ्यांना तो समजण्यास मदत होणार आहे. -शशिकांत उबाळे, शिक्षक, मनपा शाळा, दर्गारोड पाठ्यपुस्तकाची निर्मिती आकर्षक झाल्यामुळे मुलांना अभ्यासाची गोडी लागेल. त्यातील कार्टून चित्रे त्यांचे पुस्तकाशी नाते टिकवून ठेवील. पुस्तके जास्त दिवस टिकतील. - संजीव सोनार, मुख्याध्यापक, मनपा शाळा, दर्गा रोड धड्यांना अनुरूप कार्टून व चित्रांमुळे धड्यांचे महत्त्व वाढले आहे. धडा समजावून सांगताना त्यांची मदत शिक्षकांना होणार आहे. पुस्तकातील धडे व त्यांच्याशी संबंधित चित्रे, कार्टून यांची मांडणी अत्यंत आकर्षक झाली आहे. यामुळे मुलांच्या गुणवत्तेत वाढ व त्यांना अभ्यासाची गोडी लागण्यास मदत होईल. -देवेंद्र साळुंके, मुख्याध्यापक, मनपा शाळा, मुकुंदवाडी या पुस्तकांच्या छपाईसाठी मॅपलिथो नावाचा पांढराशुभ्र कागद वापरण्यात आला आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे या कागदावरील चित्रे आकर्षक आणि रंगांमध्ये उठावदार दिसतात. धडा समजून घेण्यासाठी उत्सुकता निर्माण करील अशा बोलक्या चित्रांची जोड त्याला देण्यात आली आहे. कार्टून मालिका बघणार्‍या मुलांचे पुस्तकांतील कार्टून चित्रांमुळे पुस्तकांशीही जवळीक राहील, अशी अपेक्षा आहे.

Web Title: Balbharti's Laminated Books

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.