बजाजनगरात युवकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 21:14 IST2019-06-04T21:14:42+5:302019-06-04T21:14:52+5:30
क्षुल्लक कारणावरुन २२ वर्षीय युवकास बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी दोघांविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

बजाजनगरात युवकास मारहाण
वाळूज महानगर : क्षुल्लक कारणावरुन २२ वर्षीय युवकास बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी दोघांविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागराज माधव गुंडीले (२२) हा बजाजनगरातील एका हॉस्टेलमध्ये वास्तव्यास आहे. हॉस्टेलमधील प्रकाश राजपूत व मंगेश भांबर्डे यांनी दारुच्या नशेत सोमवारी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास नागराजच्या रुमचा दरवाजा वाजवला. त्याला विलंब झाल्याने दोघांनी शिवीगाळ केली. त्यानंतर नागराज गच्चीवर झोपण्यासाठी गेला.
यानंतर प्रकाश व मंगेश याने गच्चीवर जाऊन नागराज यास मारहाण केली. हॉस्टेलमधील काहींनी मध्यस्थी करुन भांडण मिटविले. याप्रकरणी नागराज गुंडीले याच्या तक्रारीवरुन प्रकाश राजपुत व मंगेश भांबर्डे या दोघाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.