शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

इव्हेंट कंपनीत गुंतवणुकीचे आमिष, बहीण-भावाने तरुणाला घातला १७ लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 19:37 IST

तीनपेक्षा अधिक दिलेले धनादेशही वटले नाहीत : सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : इव्हेंट कंपनीत गुंतवणूक करून दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून बहीण-भावाने मिळून हडकोत राहणाऱ्या तरुणाला १७ लाख ५१ हजारांचा गंडा घातला. शुक्रवारी संजना देवीदास चौधरी व सुयश देवीदास चौधरी (दोघे रा. व्हिस्टा रेसिडेन्सी, बाणेर, पुणे) यांच्यावर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

३३ वर्षीय तरुण खासगी कंपनीत नोकरी करतो. त्याच्या भावामार्फत पुण्यातील एका बँकेत त्याची संजनासोबत ओळख झाली. संवाद वाढल्याने त्यांच्यात चांगली मैत्री झाली. तेव्हा संजनाने तिच्या इव्हेंट कंपनीबाबत त्याला माहिती दिली. काही दिवसांतच तिने मुथूट ग्रुपच्या मोठ्या इव्हेंटचे काम आल्याचे सांगून तरुणाला गुंतवणूक करण्यासाठी गळ घातली. तेव्हा तरुणाने २० मार्च ते २७ मार्चदरम्यान एकूण ५ लाख रुपये पाठवले. त्यावर बरोबरीचे नफा वाटून घेण्याबाबत संजनाने करारपत्र केले. १२ मे २०२५ रोजी एका वृत्तपत्राचा मोठा इव्हेंट मिळाल्याचे सांगून २१ मे रोजी पुन्हा तरुणाकडून ३ लाख ४० हजार रुपये घेतले.

वेगवेगळे बहाणे सांगून उकळले पैसेसंजनाने त्यानंतर तरुणाला विविध मोठ्या कंपन्यांच्या इव्हेंटचे कारण सांगून जून २०२५ पर्यंत १७ लाख ५१ हजार रुपये उकळले. वेळाेवेळी करारनामाही केला. मात्र, पैसे देण्यास टाळाटाळ केली. वडिलांचे निधन झाल्याचे सांगूनही तिने वेळ मारून नेली.

एकही धनादेश वटला नाहीतरुणाने पैशांसाठी तगादा लावल्यावर संजना व सुयशने त्यांना वारंवार काही रकमांचे धनादेश दिले. मात्र, त्यातील एकही वटला नाही. तरुणाने सिडको पोलिसांकडे तक्रार अर्ज केला. ही बाब कळाल्यावर संजनाने त्याच्याशी संपर्क साधून तक्रार मागे घेण्यास सांगून ८ नोव्हेेंबर रोजी ८० हजार रुपये देत उर्वरित रकमेचे पुन्हा तीन चेक दिले. मात्र, त्यापैकी एकही वटला नाही. सर्व इव्हेंट कामांच्या तिने बनावट ऑर्डर तयार करून तरुणाला पाठवून फसविले. विशेष म्हणजे, ही सर्व रक्कम तिने भाऊ सुयश व आईच्या बँक खात्यावर पाठवल्याचेही नंतर उघडकीस आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Event company investment lure: Siblings dupe youth of ₹17 lakhs.

Web Summary : A brother and sister from Pune cheated a young man from Chhatrapati Sambhajinagar, promising double returns on event company investments. The duo swindled him out of ₹17.51 lakhs by fabricating event orders and providing bounced checks, using various excuses to delay payments.
टॅग्स :fraudधोकेबाजीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी