शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
2
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
6
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
7
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
8
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
9
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

पशू, पक्ष्यांवर रंगाचे होतात दुष्परिणाम; तत्काळ पशू चिकित्सलयात घेऊन जा

By साहेबराव हिवराळे | Published: March 26, 2024 4:40 PM

पाळीव पशू, पक्ष्यांना रंगापासून दूर ठेवण्याचे निसर्गप्रेमींचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : होळीत काही जण गाय, बकरी, कुत्रा, मांजर, कबुतर, कोंबडी इ. पशू, पक्ष्यांवर रंग टाकतात. पण या मुक्या जिवांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. रंग अंगावर पडलेली पाळीव प्राणी, पशू, पक्षी आढळून आल्यास त्यांना तत्काळ चिकित्सलयात घेऊन जाण्याचे आवाहन निसर्गप्रेमींनी केले आहे.

लहान मुले शक्यतो मस्तीत रंग टाकतात तर ‘धुंदी’त असलेले कुठेही खुशाल रंग उडवून मोकळे होतात. याबाबत जनजागृती केली जात आहे. जनावरांना स्वतःला चाटण्याची सवय असते. यामुळे शरीराला लागलेला रंग पोटात जाऊन गंभीर विकार होण्याची भीती असते. लहान मुलांनी पिचकारीने रंग टाकल्यामुळे मांजरीच्या व श्वानांच्या कानात रंग गेल्यामुळे इजा होऊ शकते. कोरडा रंग नाका-तोंडात गेल्यास श्वास घेण्यास जळजळ होते. श्वास घेण्यासही त्रास होऊ शकतो. तसेच त्वचारोग व इतर आजार होतात. डोळ्यात रंग गेल्यास डोळा निकामी होण्याचा प्रकार होतो. त्यामुळे पाळीव पशू, पक्ष्यांना रंगापासून दूर ठेवण्याची सूचना निसर्गप्रेमींनी केली आहे.

तात्काळ उपचार करापाळलेल्या प्राण्यांना चुकून रंग लागला तरी तात्काळ शाम्पूने आंघोळ घालावी. अंगावरती खाज आल्यास तात्काळ पशू चिकित्सालयात दाखवावे.- जयेश शिंदे, सचिव, लाईफ केअर संस्था

रंगात रसायन मिश्रणाचा धोका...रंगाने त्वचा खराब होऊन त्वचेचे आजार होतात. अंगावर टाकलेल्या रंगातील रसायन मिश्रण हे प्रकृतीस धोकादायक असते. यामुळे डोळ्यांना इजा होऊन ते निकामी होऊ शकतात. रंग खेळा; परंतु पाळीव प्राण्यावर नव्हे. रंगाने अंगास जळजळ झाली तर तो प्राणी मानसिक आजारीही होऊ शकतो.- पशुवैद्यक डॉ. नीलेश जाधव

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHoliहोळी 2024Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचार