औरंगाबाद : गणेशोत्सव विसर्जनाच्या बंदोबस्तात पोलीस व्यस्त असल्याची संधी साधून चोरट्यांनी सोमवारी रात्री सिडकोतील आझाद चौकात एटीएम फोडले. संपूर्ण मशीन तोडल्यानंतरही त्यातील २९ लाख रुपये रोख रक्कम काढण्यात मात्र चोरट्यांना यश आले नाही. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.
घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, मध्यवर्ती जकात नाक्याकडून टीव्ही सेंटर जाणाऱ्या मार्गावर असलेल्या आझाद चौकाजवळच्या प्रेम कॉम्प्लेक्समध्ये एसबीएच बँकेचे एटीएम सेंटर आहे. या एटीएमची सुरक्षा रामभरोसेच आहे. येथे सुरक्षारक्षक तैनात करण्यात आलेला नाही. दरम्यान, सोमवारी गणेश विसर्जनामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा मिरवणुकीच्या बंदोबस्तात व्यस्त होती. हीच संधी चोरट्यांनी साधली. रात्री ९ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी या एटीएम सेंटरमध्ये प्रवेश केला आणि आतून शटर बंद केले.
मग सोबत आणलेल्या स्क्रू-ड्रायव्हर, पान्हा, सब्बलच्या साह्याने चोरट्यांनी एटीएम मशीनचे सर्व पार्ट तोडून टाकले. ते वेगवेगळे केले. त्यामुळे रात्री ८.३० वाजता ही मशीन बंद पडली. संपूर्ण मशीनची मोडतोड करून चोरट्यांनी त्यात असलेली पैसे ठेवण्याची तिजोरी बाहेर काढली. ही अवजड तिजोरी चोरट्यांना फोडता मात्र आली नाही.
या तिजोरीवर चोरट्यांनी मोठा दगड टाकून ती फोडण्याचा प्रयत्न केला; तरी ती तुटली नाही. आसपास गणेश विसर्जन मिरवणुकीची वाद्ये जोरात वाजत असल्याने तोडफोडीचा आवाजही बाहेर आला नाही. बराच वेळ झटल्यानंतर त्यातील २९ लाख रुपये रोख रक्कम बाहेर न निघाल्यामुळे शेवटी या चोरट्यांनी आपले चोरीसाठी आणलेले साहित्य तेथेच सोडून अर्धे शटर बंद करून धूम ठोकली.
या मशीनमध्ये तीन दिवसांपूर्वीच ३० लाख रुपये रोख रक्कम टाकण्यात आलेली होती. काल दिवसभरात त्यातील ९२ हजार ७०० रुपये काढण्यात आले होते. उर्वरित २९ लाख ७ हजार ३०० रुपये मशीनमध्ये होते. सुदैवाने ते वाचले.
विशेष म्हणजे ही मशीन बंद पडल्याचा मॅसेज रात्री ९.३० वाजेच्या सुमारासच ही यंत्रणा संभाळणाऱ्या योगेश शेळके यांना मिळाला होता. त्यांनी तातडीने येथे येऊन चौकशी करण्याची तसदी घेतली नाही. सकाळी ९.३० वाजता म्हणजेच तब्बल १२ तासांनंतर शेळके आज सकाळी या सेंटरवर पोहोचले. तेव्हा चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच सिडको ठाण्याचे निरीक्षक राजकुमार डोंगरे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले.
श्वान पथकाच्या साह्याने पोलिसांनी आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यात यश आले नाही.
आझाद चौकातील एटीएम फोडले
By admin | Updated: September 10, 2014 00:53 IST
औरंगाबाद : गणेशोत्सव विसर्जनाच्या बंदोबस्तात पोलीस व्यस्त असल्याची संधी साधून चोरट्यांनी सोमवारी रात्री सिडकोतील आझाद चौकात एटीएम फोडले.
आझाद चौकातील एटीएम फोडले
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}