‘लोकमत विंटर’धमाका योजनेतील विजेत्यांना बक्षीस वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:08 IST2018-05-25T00:07:50+5:302018-05-25T00:08:49+5:30
बहुचर्चित ‘लोकमत विंटर धमाका’तील विजेत्यांना एका भव्य कार्यक्रमात ‘लोकमत भवन’ परिसरात मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले.

‘लोकमत विंटर’धमाका योजनेतील विजेत्यांना बक्षीस वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : बहुचर्चित ‘लोकमत विंटर धमाका’तील विजेत्यांना एका भव्य कार्यक्रमात ‘लोकमत भवन’ परिसरात मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले.
औरंगाबाद-जालना-बीड जिल्ह्यांतून प्राप्त हजारो प्रवेशिकांमधून भाग्यवान विजेत्यांची लकी ड्रॉद्वारे निवड करण्यात आली होती. ‘लोकमत’तर्फे वाचकांसाठी नेहमीच विविध उपक्रम, बक्षीस योजना राबविण्यात येतात. अशीच एक भव्य बक्षीस योजना ‘लोकमत विंटर धमाका’ राबविण्यात आली.
१ डिसेंबर २०१७ ते ११ मार्च २०१८ या कालावधीत घेण्यात आलेल्या या योजनेत १०० कूपन्स प्रकाशित करण्यात आली होती. त्यापैकी ७५ कूपन्स प्रवेशिकेवर चिकटवून हजारो वाचकांनी या योजनेत सहभाग नोंदविला.
हजारो प्रवेशिकांमधून लकी ड्रॉद्वारे विजेत्यांना आज औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, महेश आॅटोचे संचालक अजय गांधी, भाग्यविजयचे विजय चाटोरीकर, सामाजिक कार्यकर्ते नरेश भालेराव आदी मान्यवरांच्या हस्ते प्रथम बक्षीस हीरो मोटारसायकल, द्वितीय बक्षीस टीव्हीएस स्कूटी पेप, तृतीय बक्षीस सुदर्शन सोलार वॉटर हिटर, चतुर्थ बक्षीस गोवा टूर, पाचवे बक्षीस इलेक्ट्रिकल गिझर व सहावे बक्षीस इंडक्शन कुकर देण्यात आले.
याप्रसंगी ‘लोकमत’च्या वतीने मान्यवरांचे स्वागत ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष संदीप विश्नोई, संपादक सुधीर महाजन, प्रमोद मुसळे यांच्या हस्ते करण्यात आले.