अपघात टाळण्यासाठी बीड शहर वाहतूक शाखा सरसावली

By Admin | Updated: May 19, 2014 01:02 IST2014-05-19T00:37:52+5:302014-05-19T01:02:48+5:30

बीड: सध्या मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक केली जात आहे़ या अवैध वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे़

To avoid the accident, Beed is heading the Transport Department | अपघात टाळण्यासाठी बीड शहर वाहतूक शाखा सरसावली

अपघात टाळण्यासाठी बीड शहर वाहतूक शाखा सरसावली

बीड: सध्या मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक केली जात आहे़ या अवैध वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे़ या अपघाताला आळा बसविण्यासाठी व अवैध वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाया करण्यासाठी शहर वाहतूक शाखा सरसावली आहे़ शहरासह ग्रामीण भागात जाऊन अवैध वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाया कराव्यात, असे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत़ या कारवाईसाठी एका अधिकार्‍यासह सात कर्मचार्‍यांचा ताफा ग्रामीण भागात रवाना होणार आहे़ सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक केली जाते़ खाजगी वाहनधारक वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक नागरिक घेऊन जात असल्याने अपघाताची दाट शक्यता असते़ याचीच दखल घेत अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी शहर वाहतूक शाखेला केवळ शहरातच कारवाया न करता ग्रामीण भागात जाऊन अवैध वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाया कराव्यात असे आदेश दिले आहेत़ मागील दोन महिन्यापासून शहर वाहतूक शाखेच्यावतीने विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत़ एप्रिल व मे महिना लग्नसराईचा असल्याने या कालावधीत मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते़ अशा गर्दीत वाहनांचे अपघात होऊ नयेत म्हणून पोलिस प्रशासनाकडून काळजी घेण्यात येत आहेत़ अवैध वाहतूक करणार्‍या वाहनांवर थेट खटले दाखल करण्यात येणार असल्याचे पोना आरक़े़नेवडे यांनी सांगितले़ या ताफ्यात तात्यासाहेब बांगर, सोमनाथ कुंभार, सानप, चाटे, सोनवणे, साळुंके, मन्सूर, अहंकार, गोरे, गुरखुदे, तांदळे, तोंडे, जायभाये, जाधवर, देशमुख, बनसोडे, कुडुक, सिद्दीकी, बांगर आदी कर्मचारी शिफ्टवाईज सोबत असणार आहेत़(प्रतिनिधी) तर ‘त्या’ वाहनांचे रजिस्ट्रेशन होणार रद्द या कारवाईच्या मोहिमेला सोमवारपासून सुरूवात करण्यात येणार असून ज्या वाहनांवर एकापेक्षा अधिक अवैध वाहतुुकीचे खटले आहेत अशा वाहनांवर पुन्हा खटले दाखल करून संबंधित वाहनांना पोलिस ठाण्यात जमा करून आरटीओच्या माध्यमातून त्यांचे रजिस्ट्रेशन काही कालावधीपुरते रद्द करण्यात येणार असल्याचे शहर वाहतूक शाखेचे पोउपनि बांगर यांनी सांगितले़

Web Title: To avoid the accident, Beed is heading the Transport Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.