‘विकास’ चे सरासरी ८० टक्के मतदान

By Admin | Updated: February 22, 2015 00:37 IST2015-02-22T00:34:11+5:302015-02-22T00:37:50+5:30

लातूर : विकास सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी शनिवारी सरासरी ८० टक्के मतदान झाले आहे़ ११ मतदान केंद्रावरील ६९ बुथवर सकाळी

The average voting percentage of 'development' is 80 percent | ‘विकास’ चे सरासरी ८० टक्के मतदान

‘विकास’ चे सरासरी ८० टक्के मतदान


लातूर : विकास सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी शनिवारी सरासरी ८० टक्के मतदान झाले आहे़ ११ मतदान केंद्रावरील ६९ बुथवर सकाळी ८ वाजता मतदानाला सुरूवात झाली़ दिवसभर उन्हाचे चटके असतानाही सभासद मतदारांनी उत्स्फू र्तपणे मतदान केले़ आर्वी येथील मतदान केंद्रावर ११२ वर्षे वयाच्या रामचंद्र भाऊराव पवार (रा़ साई) यांनी मतदान केले़
विकास सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी प्रथमच मतदान झाले़ विलासराव देशमुख सहकार पॅनल विरूध्द सर्वपक्षीय स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनल निवडणूक रिंगणात आहेत़ रविवारी सकाळपासून दोन्ही पॅनलकडील कार्यकर्त्यांनी सभासदांचे मतदान करून घेण्यासाठी त्यांच्या घराला खेटे घातले़ सकाळी ८ वाजता मतदान सुरू झाले दुपारी १२ वाजेपर्यंत बहुतांश मतदान केंद्रावर सभासदांनी मतदानासाठी गर्दी केली होती़ दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता वाढलेली असतानाही वृध्द मतदारांनी मतदान केंद्र गाठले़ दिवसभरात सरासरी ८० ते ८५ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक विभागाच्या सांगण्यात आले़ निवळी येथील विकास सहकारी साखर कारखान्याचे १० हजार ३३९ सभासद आहेत़ कारखाना कार्यक्षेत्रातील गावांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून निवडणुकीची चांगलाच ज्वर होता़ लातूर तालुक्यातील निवळी, गुंफावाडी, गातेगाव, शिराळा, गादवड, जोडजवळा, जेवळी, गंगापूर, आर्वी, बाभळगाव, ममदापूर येथील केंद्रावर मतदान झाले़

Web Title: The average voting percentage of 'development' is 80 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.