भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी औताडे तर शहराध्यक्षपदी बोराळकर यांची निवड ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 19:54 IST2019-08-19T17:31:49+5:302019-08-19T19:54:50+5:30

विजय औताडे आणि शिरीष बोराळकर यांची निवड करून पक्षाला नवी ताकद देण्याचा प्रयत्न

Autade as BJP's rural district president and Boralakar as city president | भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी औताडे तर शहराध्यक्षपदी बोराळकर यांची निवड ?

भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी औताडे तर शहराध्यक्षपदी बोराळकर यांची निवड ?

औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाच्या औरंगाबाद ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी विजय औताडे तर शहराध्यक्षपदी शिरीष बोराळकर यांची निवड करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

औरंगाबाद जिल्हा आणि शहरासाठी विजय औताडे आणि शिरीष बोराळकर यांची निवड करून पक्षाला नवी ताकद देण्याचा प्रयत्न असेल. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नूतन कार्यकारणी निवडण्या मागे स्वबळावर निवडणूक लढविण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.  

विजय औताडे हे एकनाथ जाधव यांची जागा घेतील. औताडे यांनी यापूर्वी पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढवली आहे. विशेष म्हणजे २०१४ साली त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.तर शहराध्यक्षपदी निवड झालेले शिरीष बोराळकर हे प्रदेश प्रवक्ते म्हणून काम पहात होते. मात्र,या माहितीस अद्याप पक्षाकडून अधिकृत दुजोरा मिळाला नाही.

Web Title: Autade as BJP's rural district president and Boralakar as city president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.