शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

औरंगाबादचे व्हिजन २०२१; यावर्षात शहराला काय मिळणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 14:26 IST

Aurangabad's Vision 2021: राज्य शासनाचे पाठबळ, यंत्रणांचा कार्यक्षम कारभार आणि राजकीय नेत्यांचा पाठपुरावा यांची सांगड झालेली पहावयास मिळेल, अशी अपेक्षा.

ठळक मुद्देनवीन वर्षात औरंगाबादकरांना खूप काही नवीन मिळण्याची शक्यता आहे. नवीन वर्ष सुख-समृद्धी, भरभराटीसह आरोग्यदायी जावे अशी सर्वजण प्रार्थना करीत आहेत.

औरंगाबाद : कोरोनारूपी महाभयंकर विषाणूने औरंगाबादकरांना मावळत्या वर्षात जेरीस आणले. नवीन वर्ष सुख-समृद्धी, भरभराटीसह आरोग्यदायी जावे अशी सर्वजण प्रार्थना करीत आहेत. नवीन वर्षात औरंगाबादकरांना खूप काही नवीन मिळण्याची शक्यता आहे. शहराची तहान भागविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या १६८० कोटी रुपयांच्या जलवाहिनी योजनेचे किमान २० टक्के काम पूर्ण होईल. स्मार्ट सिटी योजनेत अनेक प्रकल्प कार्यान्वित होतील. १५० कोटी रुपयांचे २३ गुळगुळीत रस्ते पूर्ण होतील. याशिवाय अनेक कार्यालय आणि उपक्रम यावर्षात मार्गी लागू शकतात. यासाठी राज्य शासनाचे पाठबळ, यंत्रणांचा कार्यक्षम कारभार आणि राजकीय नेत्यांचा पाठपुरावा यांची सांगड झालेली पहावयास मिळेल, अशी अपेक्षा.

जलवाहिनी योजनेचे किमान २० टक्के काम पूर्ण होईलमागील १० वर्षांपासून औरंगाबादकर जायकवाडी शहरात मुबलक प्रमाणात पाणी आणण्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेची वाट पाहत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते १२ डिसेंबर रोजी या योजनेचे भूमिपूजन झाले. नवीन वर्षात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मोठी जलवाहिनी टाकून शहरात मुबलक पाणी आणण्याचे काम सर्वप्रथम होणार आहे. या कामासाठी तीन वर्षांचा कालावधी असला तरी पहिल्या वर्षी किमान २० टक्के काम पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत हे काम करण्यात येणार आहे. दुसरीकडे स्मार्ट सिटी योजनेत केंद्र शासनाकडून मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. शहरात ७०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मार्चपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल. याशिवाय राज्य शासनाने दिलेल्या दीडशे कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामेही वर्षभरात मार्गी लागतील. 

जंगल सफारी पार्कचे काम सुरू होणारमहसूल विभागाने महापालिकेला पहिल्या टप्प्यात मिटमिटा येथे १०० एकर जागा उपलब्ध करून दिली. या जागेवर महापालिकेने सफारी पार्क उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तेथे जंगल सफारी पार्क करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यासाठी आणखी अतिरिक्त जागा महसूल विभागाकडून घेण्यात आली. जवळपास पावणेदोनशे एकर जागेवर जंगल सफारी पार्क उभारण्याचा मनोदय आहे. या कामासाठी स्मार्ट सिटी योजनेतून जवळपास १७० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. जंगल सफारी पार्कच्या जागेला संरक्षण भिंत बांधण्यासाठी स्मार्ट सिटीतून ११ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. नवीन वर्षात हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. 

डीएमआयसीमध्ये येतील ३० कंपन्यादिल्ली- मुंबई- इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआयसी)अंतर्गत असलेल्या ऑरिक सिटीमध्ये २०२१ या नवीन सालामध्ये मोठी गुंतवणूक होईल, अशी अपेक्षा आहे. शेंद्रा-बिडकीन ते वाळूजपर्यंतचा इंडस्ट्रिअल रस्ता पूर्ण होण्यासाठी पाऊल उचलले जाण्याची शक्यता आहे. डीएमआयसीच्या पहिल्या नोडमध्ये मूळ रूपात गुंतवणूक होऊन हा टप्पा पूर्णत्वास जाईल. लॅण्डस्केपिंग व इतर कामे पूर्ण करण्यास गती देण्यात येईल. माहिती तंत्रज्ञानातील गुंतवणुकीच्या अनुषंगाने २०२० मध्ये चाचपणी झाली. २०२१ मध्ये गुंतवणुकीच्या उद्देशाने प्रयत्न होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या निमित्ताने १२८ कंपन्यांनी सामंजस्य करार केले. वाळूज, पैठण एमआयडीसीत उद्योगांना जागा दिली आहे. ऑरिक सिटीतील ३० कंपन्या येण्याबाबत चर्चा झाल्या. या कंपन्या नववर्षात येतील, असे काही घडावे.

बिडकीन इंडस्ट्रिअल पार्कबिडकीनमधील इंडस्ट्रिअल पार्कमध्ये आंतरराष्ट्रीय कंपन्या येणार असल्याच्या चर्चेने २०२० हे साल संपले. आता २०२१ मध्ये साक्षात गुंतवणूक होऊन कंपनीची मुहूर्तमेढ रोवली जावी, तसेच त्याठिकाणी मेगा फूडपार्क सुरू व्हावेत, अशी अपेक्षा आहे. शेंद्रा-डीएमआयसी आणि बिडकीन इंडस्ट्रिअल पार्कसाठी सुमारे २ हजार कोटी रुपयांची शासकीय गुंतवणूक झालेली आहे. याचे फलित नववर्षात पाहायला मिळेल, ही अपेक्षा.

दळणवळणाच्या प्रकल्पांनी घ्यावी झेपसोलापूर ते औरंगाबादमार्गे धुळे या राष्ट्रीय महामार्गाचे लोकापर्ण यंदा व्हावे. औट्रम घाटाच्या कामाला साक्षात सुरुवात झाल्यास पुढील काही वर्षांत बोगद्याचे काम पूर्ण होऊ शकेल. औरंगाबाद ते अजिंठा हा रस्ता वाहतुकीस पूर्ण क्षमतेने खुला होण्याची अपेक्षा आहे. बीड बायपास हा रस्ता रुंदीकरणासह पूर्ण होऊन नागरिकांची अपघात मार्गातून सुटका होण्याची अपेक्षा सर्वांना आहे. समृद्धी महामार्गाचे औरंगाबाद जिल्ह्यातील काम पूर्ण होण्यासाठी वेगाने काम होईल. सध्या ३० टक्के काम पूर्ण होत आले आहे.

घाटीत ‘सुपर स्पेशालिटी’ उपचारघाटी रुग्णालयात केंद्र आणि राज्य सरकारच्या साह्याने उभारण्यात येणाऱ्या स्वतंत्र सुपर स्पेशालिटी ब्लॉकच्या इमारतीत नव्या वर्षात रुग्णसेवा सुरु होण्याची आशा आहे. या ५ मजली इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. अनेक यंत्रसामग्रीही कार्यान्वित झाली आहे. पहिल्या टप्प्यातील पद निर्मितीलाही मंजुरी मिळाली आहे. ही पदभरती होऊन ही इमारत कार्यान्वित होणे अपेक्षित आहे. येथे हृदयरोग, मेंदूविकार, मूत्रपिंड विकार यांसह विविध सुपर स्पेशालिटीचे सर्व उपचार उपलब्ध केले जाणार आहेत.

महिला रुग्णालयाची उभारणीगेल्या ७ वर्षांपासून केवळ कागदावर असलेल्या २०० खाटांचे महिला व नवजात शिशू रुग्णालयाच्या उभारणीला नव्या वर्षात सुरुवात होण्याची शक्यता आहे. या रुग्णालयासाठी दूध डेअरीची जागा मिळालेली आहे. तसेच १११ कोटी ८९ लाखांच्या निधीला मंजुरीही आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन २०२१ मध्ये या रुग्णालयाच्या उभारणीचा नारळ फुटून किमान २० टक्के काम होण्याची आशा आहे.

बसपोर्ट, मध्यवर्ती बसस्थानकाच्या कामाला प्रारंभपर्यटन राजधानी असलेल्या सिडको बसस्थानकाच्या जागी उभारण्यात येणाऱ्या बसपोर्ट आणि मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे २८ ऑगस्ट २०१९ रोजी भूमिपूजन झाले. परंतु अद्यापही हे काम सुरू झालेले नाही. मध्यवर्ती बसस्थानकाच्या नवीन इमारतीसाठी बांधकाम शुल्क माफ करावे, अशी मागणी एसटी महामंडळाने महापालिकेकडे केली आहे. परंतु मनपाने त्यासंदर्भात निर्णय न घेतल्याने बसस्थानक उभारणीच्या कामाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. परंतु ही सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन २०२१ मध्ये किमान २० ते ३० टक्के काम होऊ शकेल.

करोडीतील ‘ग्रीन बिल्डिंग’ जाईल पूर्णत्वाकडेशहरापासून काही अंतरावर असलेल्या साजापूर करोडी येथे आरटीओ कार्यालयाच्या जागेवर मुख्य इमारत बांधण्यात येत आहे. ही चार मजली इमारत, ‘ग्रीन बिल्डिंग’ संकल्पनेनुसार बांधण्यात येत आहे. मार्च २०२१ पर्यंत ही इमारत उभी करण्याचे लक्ष्य आहे. पण या चार मजली इमारतीच्या कामालाही कोरोनाचा फटका बसला आहे. सध्या ५० टक्के काम झाले आहे. २०२१च्या वर्षअखेरपर्यंत ८० टक्क्यांवर काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

हज हाऊसचे काम यंदा तरी पूर्ण होणार का?किलेअर्क येथे हज हाऊसच्या उभारणीचे काम सुरू आहे. सिडको प्रशासनाकडून हे काम करण्यात येत आहे. तीन वर्षांपूर्वी कंत्राटदार वेगाने काम करत नसल्याचा आरोप करीत दुसरा कंत्राटदार नेमण्यात आला. त्यानंतरही प्रकल्पाला गती आली नाही. नवीन वर्षात तरी हा प्रकल्प पूर्ण होईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हज हाऊसच्या बाजूला असलेल्या वंदे मातरम् सभागृहाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.

या इमारती आणि कार्यालये पूर्ण व्हावेतजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या इमारतीच्या कामाला २०२१ मध्ये सुरुवात होईल. विभागीय शासकीय संकुलाच्या कामाची संचिका ठप्प असून, नववर्षात त्याला चालना मिळणे शक्य आहे. विमानतळ धावपट्टी रुंदीकरणासाठी भूसंपादन प्रक्रियेला वेग येणे शक्य होईल. औरंगाबाद मेट्रोपॉलिटियन रिजनल डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटीचे कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची अपेक्षा २०२१ मध्ये आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधी